नंदुरबार| प्रतिनिधी
पश्चिम रेल्वेच्या गुजरात राज्यातील उधना रेल्वे स्थानकावरील प्लॅट फॉर्मचा कामासाठी चार दिवसाचा ब्लॉक असल्याने होळीपुर्वी अनेक गाडया रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
गुजरात राज्यातील उधना रेल्वे स्थानकावर प्लॉट फॉर्मचा कामासाठी दि.३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपासून दि.६ सकाळी ९ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेतर्फे ब्लॉक असल्याने अनेक गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. अचानकपणे झालेल्या या निर्णयामुळे दि.३ व ४ मार्च रोजी प्रवाशांचे मोठी गैरसोय झाली. दरम्यान हा ब्लॉक उद्या दि. ५ व ६ मार्च रोजी देखील असणार आहे. त्यामुळे नंदुरबार येथील प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून प्रवाशांनी टिकीटे बुक करून ठेवली आहे. ऐन होळीचा अगोदर रेल्वे ब्लॉक झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
या रेल्वे गाड्या झाल्या रद्द
आज दि. ५ मार्च रोजी १९४२६ नंदुरबार बोरीवली- पॅसेंजर, २०९२५ अमरावती-सुरत, १९४२५ बोरीवली-नंदुरबार १९००७ सुरत-भुसावळ या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. दि.६ मार्च रोजी २०९२६ अमरावती-सुरत, ०९०५२ भुसावळ-बांद्रा, १९००५ सुरत-भुसावळ, २२१३८ अहमदाबाद- नागपूर (प्रेरणा एक्सप्रेस) या गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. तर दि.८ मार्च रोजी १९००६ भुसावळ-सुरत (पॅसेंजर) रद्द करण्यात आली आहे.
या रेल्वे गाड्यांमध्ये अंशता अदल
अनेक गाडयांमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून यात दि.५ मार्च रोजी १९१०६ पाळधी-उधना ही गाडी चलनाथपर्यंत असणार आहे. तर १९००४ भुसावळ- बोरीवली ही गाडी भुसावळपासून नवापूरपर्यंत धावणार आहे. तर १९००६ भुसावळ-सुरत ही भुसावळहुन सोनगडपर्यंतच धावणार आहे. ०९०९६ नंदुरबार-सुरत चलनाथपर्यंतच धावणार आहे. ०९३७८ नंदुरबार-सुरत मेमो चलथानपर्यंतच जाणार आहे. २०९३० वारासणी- उधना चलनाथपर्यंत तर १९००८ भुसावळ-सुरत रेल्वेगाडी बारडोलीपर्यंत धावणार आहे. ०९०९५ सुरत- नंदुरबार ही गाडी चलथानहुन सुटून नंदुरबारपर्यंत ०९३७७ सुरत-नंदुरबार ही गाडी चलथानहुन नंदुरबारपर्यंत धावणार आहे. तर १९१०५ उधना-भुसावळ ही गाडी उधना ते चलथान दरम्यान रद्द करण्यात आली असून चलथान ते नंदुरबार दरम्यान धावणार आहे. दि.६ मार्च रोजी १९००८ भुसावळ-सुरत गाडी ही बारडोलीपर्यंत जाणार आहे तर २०९३० वाराणसी-उधना ही रेल्वेगाडी चलथानपर्यंत धावणार आहे.