नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथे कुंपण का तोडले असे विचारल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाल्याने यात सहा जणांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील वसलाई येथील सरलाबाई मनेष वसावे यांनी घराशेजारी राहणाऱ्या सुनिता अशोक गावित यांना काटेरी कुंपण का तोडले असे विचारले. याचा राग आल्याने सरलाबाई वसावे व त्यांचे पती मनेष वसावे यांना सुनिता अशोक गावित, राजश्री विपुल वळवी, जयश्री प्रकाश वळवी, अश्विनी अशोक गावित यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत सलाबाई वसावे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वंतू गावित करीत आहेत. तसेच सुनिता अशोक गावित यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावात येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावर काटेरी कुंपन का केले याबाबत सुनिता गावित यांनी मनेष रमेश यांना विचारले. याच राग आल्याने सुनिता अशोक गावित, जयश्री प्रकाश वसावे यांना सरला मनिष वसावे हिने काठीने मारहाण केली. साहिल वसावे, समुवेल वसावे यांनी हाताबुक्यांनी मारहाण केली. यावेळी सुनिता गावित यांची मुलगी जयश्री वसावे, राजश्री वळवी व रेवाबाई करणसिंग, मंदाबाई या भांडण सोडविण्यासाठी गेल्या असता मनिष वसावे व साहिल यांनी मारहाण केली. याबाबत सुनिता गावित यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक केशव गावित करीत आहेत.








