Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथे उद्या भरणार आदिवासी परंपरेचा भोंगऱ्या बाजार

team by team
March 4, 2023
in सामाजिक
0
बोरद येथे उद्या भरणार आदिवासी परंपरेचा भोंगऱ्या बाजार
बोरद l प्रतिनिधी
आदिवासी परंपरेत वैशिष्ट्यपूर्ण स्थान असलेल्या भोंगऱ्या बाजार हा बोरद येथे दि. ५ मार्च रोजी आहे. होळीही दि. ६ मार्च रोजी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला असून एक दिवस अगोदर म्हणजे ५ मार्च रोजी भोंगऱ्या भरत असतो.
  आदिवासी सण परंपरेमध्ये होळीला सर्वाधिक महत्त्व आहे. होळी पूजनासाठी आवश्यक साहित्याची खरेदीसाठी भोंगऱ्या
 बाजार भरविण्यात येतो. डाळ्या, खोबरे, गुळ,खजूर, हारकंगन व लहान मुलांची खेळणीची दुकाने संसार उपयोगी वस्तू तसेच मेवा मिठाई ची दुकाने ही बाजारात मोठ्या प्रमाणात लावली जात असतात. वयानुसार युवक युवतींचा गरजा लक्षात घेऊन विविध वैशिष्ट्यपूर्ण साहित्याची दुकाने ही मोठ्या प्रमाणात दिसून येतात बोरद गाव हे सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेले गाव असून १२ हजार लोकसंख्येचे गाव आहे बोरद गावाला लागून शेजारीच ३६ आदिवासी खेडे जोडलेले आहेत. या परिसरातील सर्व आदिवासी बंधू भोंगऱ्या बाजार करण्यासाठी बोरद येथे येत असतात.
    बोरद गाव हे मध्यप्रदेश गुजरात व महाराष्ट्र या तिन्ही राज्याच्या सीमेवर वसलेले गाव आहे.होळी हा आदिवासी बंधूंचा मुख्य सण असतो. त्यामुळे आदिवासी समाजातील तरुण ज्या ठिकाणी रोजगारासाठी कामासाठी नोकरीसाठी धंद्यासाठी बाहेरगावी गेलेले असतात ते दोन दिवस होळी करण्यासाठी आपल्या गावी येत असतात तसेच मुली ही ज्या आपल्या सासरी गेलेल्या असतात त्या सुद्धा होळी सण साजरा करण्यासाठी आपल्या आई-वडिलांकडे येत असतात.
    तळोदा तालुक्यात फक्त बोरद येथेच भोंगर्‍या बाजार भरत असतो. या भोंगऱ्या बाजारात सर्व आदिवासी बंधू आपल्या समाजाचा पेहरावानुसार ढोल, ताशाच्या गजरात वाजत गाजत येत असतात त्या ठिकाणी आपले सर्व नातेवाईक बोरद येथे एकत्र येतात व भेटत असतात व आपली खुशाली विचारत असतात. मनोरंजनाच्या दृष्टीने भोंगर्‍या बाजारात सामूहिक नृत्याचा कार्यक्रम होत असतो. सायंकाळी होळी पूजनाचे साहित्य घेऊन आपापल्या गावी जात असतात व दुसऱ्या दिवशी आपल्या गावी होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतात.
  भोंगऱ्या बाजार होळी सण हा आदिवासी बंधूंचा मुख्य सण असल्याने सर्व आदिवासी बंधू भोंगर्‍या बाजार करण्यासाठी बोरद येथे येत असतात त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने आठ दिवस अगोदर स्वच्छता मोहीम राबवत गावात लाईट ही बसविण्यात आले असून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फत २४ तास आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे. २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी विद्युत वितरण कंपनीला ग्रामपंचायत प्रशासनाने पत्र दिलेले आहे.
    बोरद गावाला सध्या यात्रेचे स्वरूप आलेले आहे दोन दिवसात लाखोंची उलाढाल भोंगर्‍या बाजारात होत असते. ‘काळूमोडू करीने आवजो मारा बोरदना भोंगर्‍या बाजार मे’ या गाण्याचे सूर पान टपरी, दुकानदार याठिकाणी लावले असतात. त्या तालावर तरुण नाचत असतात. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता होळी पूजन करत गावातील मुखिया यांच्या हस्ते होळी पेटवली जात असते त्यावेळी ढोल ताशा च्या गजरावर तरुण रिंग होळीचा आजूबाजूला फिरून होळी मातेचे दर्शन घेत असतात. नंतर महिला वर्ग होळी मातेचे पूजन करून नैवेद्य दाखवीत असतात व दर्शन घेत असतात. होळीच्या शिवाय घरी कोणीही जेवण करीत नाही अशी प्रथा आहे.नंतर महिलावर्ग होळी मातेचे पूजन करून नैवेद्य दाखवीत असतात व दर्शन घेत असतात होळी पेटवल्या शिवाय घरी कोणीही जेवण करीत नाही अशी प्रथा आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बाबा गरीबदास मंदिरात आजपासून तीन दिवस वार्षिक मेला उत्सवात विविध कार्यक्रम

Next Post

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची आत्महत्या, तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

प्रेमसंबंध तोडल्याने तरुणाची आत्महत्या, तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add