नंदूरबार l प्रतिनिधी
विसरवाडी येथील हार्दिक पेट्रोल पंपावर मोटरसायकलीत पेट्रोल भरताना अचानक लागली आग लागली.युवकाच्या सतर्कने मोठा अनर्थ टळला .
नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावातील हार्दिक पेट्रोल पंपावर एक अजब घटना घडली आहे. येथे पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका युवकाचे दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. अचानकपणे पेट घेतल्यामुळे काय करावे हे येथील लोकांना समजले नाही. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या इतर वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पेट्रोल पंपावर लागलेली आग पाहून लोक सैरावैरा पळू लागले.
दरम्यान त्या ठिकाणी असणारे कर्मचारी अमोल गावित यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून फायर फायटरचा सिलिंडर फोडून तत्काळ आग विझविली त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. अमोल गावित याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नवापूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर ही घटना अचानकपणे घडली. यावेळी सिलिंडर फोडून आग विझवण्यात आली नसती तर मोठा अनर्थ घडला असता.
चक्क पेट्रोल पंपाने पेट घेतला असता. मात्र अमोल गावित यांनी हजरजबाबीपणा दाखवल्यामुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा विसरवाडी परिसर आगीचा विख्यात सापडला असता मोठा अनर्थ टळला आहे. पेट्रोल पंपावर एक मोटरसायकल पेट्रोल भरण्यासाठी आले असता अचानक आग लागली की आग कशामुळे लागली याचा कारण समजू शकले नाही परंतु तात्काळ पेट्रोल पंप वरील कर्मचारी अमोल गावित यांनी आग नियंत्रित केले.