Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला साडेतीन लाखाची लाच घेताना अटक

team by team
March 3, 2023
in क्राईम
0
गलेगठ्ठ पगार असताना लाचेची मागणी: ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी खाजगी पंटर सह आरटीओला रंगेहाथ अटक
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याचे प्रकरण ताजे असताना शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशासाठी शासकीय ठेकेदाराकडून साडेतीन लाख रुपयांची लाच स्विकारतांना  रंगेहात पकडण्यात आले आहे. सदरची कारवाई नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी  शहादा येथील एका शासकीय ठेकेदाराकडून रस्ते कामाच्या कार्यारंभ आदेशासाठी पैशांची मागणी केली. शासकीय ठेकेदारांनी याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार काल दि.२ मार्च रोजी सापळा रचण्यात आला होता.
ठरल्याप्रमाणे एकूण रकमेपैकी काल सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड शासकीय निवासस्थान येथे स्विकारत असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंच साक्षीदारांसमक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश पाटील यांना रंगेहात पकडले. सुमारे साडेतीन लाख रुपयांची रोकड पथकाने हस्तगत केली असल्याचे समजले आहे. रात्री सुमारे ८.३० वाजेच्या सुमारास सदरची कारवाई करण्यात आली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ तसेच पोहेकॉ.विजय ठाकरे, अमोल मराठे, पोना.देवराम गावित आदींच्या पथकाने केली आहे.नंदूरबार येथे मंडळ अधिकाऱ्याला लाच घेताना अटक झाल्याचे प्रकरण ताजे असताना हे प्रकरण घडले.दोन महिन्यात पाच कारवाया करण्यात आल्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

सपना सोनवणे, शिवम बोराणे यांची राज्य स्तरीय यूथ २० परीषदेसाठी निवड

Next Post

रावलापाणी हत्याकांड एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण : जि. प अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत

Next Post
रावलापाणी हत्याकांड एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण : जि. प अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत

रावलापाणी हत्याकांड एक ऐतिहासिक घटनेचे स्मरण : जि. प अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add