नंदुरबार | प्रतिनिधी
येथील जी.टी. पाटील महाविद्यालयात यूथ २० ही जिल्हा स्तरीय कार्यशाळा संपन्न झाली,
या कार्यशाळेचे उदघाटन प्रमुख अतिथी, नं.ता.वि.समितीचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, सरचिटणीस यशवंत देवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशात्र विभागाचे प्रमुख डि.एम.सुपलेकर यांनी केले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पत्रकार मनोज शेलार यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना जी २०,प्रसंगी. यूथ २० बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, आपल्या मनोगतात ते भारताचे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य नंतर कृषी,उद्योग, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शेत्रात भारताची झालेली प्रगतीची माहिती देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात शांतता आणि सहकार्य निर्माण करण्यासाठी निर्माण झालेल्या वेगवेगळ्या संघटनांची माहिती देऊन जी २०,प्रसंगी. यूथ २० बद्दल सविस्तर माहिती देऊन यूथ २० ही संस्था विद्यार्थ्यांच्या व्यक्ती मत्व विकासासाठी तसेच सहभागासाठी कशी महत्त्वाची आहे हे सांगून ू-२० बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात जळगांव येथील कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातुन अर्थशात्र या विषयात प्रथम आलेली दीव्या महाजन व सूक्ष्म जीवशास्त्राचा गोल्ड मेडल विद्यार्थी वेदांत पटेल यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नं.ता.वि.समितीचे समन्वयक एम.एस.रघुवंशी, उपप्राचार्य निलेश सोमाणी,अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक डॉ. विजय चौधरी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एन.डी.चौधरी, शिक्षणशात्र महाविद्यालयाचे प्राचार्या प्रा.डॉ. एम.एस.रघुवंशी उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.उदघाटन समारंभाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम.जे.रघुवंशी यानी भूषविले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना यूथ २० या संस्थेत सहभागी होणे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले. उदघाटन कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी वक्तृत्व व ग्रुप चर्चा या दोन स्पर्धा घेण्यात आल्या.
वक्तृत्व स्पर्धेत २१ विद्यार्थ्यी सहभागी झाले होते तर गट चर्चा मध्ये १४ विद्यार्थी सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थ्यांमधून महाविद्यालय स्तरावर सपना सोनवणे, शिवम बोराणे, आदर्श संघपाल, प्रेरणा ठाकरे, मृणाली बोराणे या पाच विद्यार्थ्यां मधून गुणाणूक्रमे दोन विद्यार्थी सपना सोनवणे, शिवम बोराणे यांची पुणे येथील सिब्बांसिस विद्यापीठ येथे होणार्या राज्य स्तरीय यूथ २० परीषदेसाठी निवड करण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.या दुपारच्या सत्राचे अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम.जे.रघुवंशी यानी केले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जी.टी.पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. विजया पाटील, विधि महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. सनी हासानी,तसेच शिक्षणशात्र महाविद्यालयाचे सहा.प्राध्यापक कैलास चौधरी हे लाभले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. माधव कदम व धनंजय पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी,डॉ. पी.ए.भामरे, डॉ. एस.बी.वायसे,डॉ. माधव वाघमारे, डॉ.जी.एच.बलदे,डॉ. धनंजय पाटील, रुपेश देवरे, प्रा.जे. सी.पाटील,डॉ. संदीप पाटील,संदीप बडगुजर ई.व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मेहनत घेतली.