Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते कोकणी हिल पोलीस चौकीचे भूमीपूजन

team by team
March 2, 2023
in राज्य
0
विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते कोकणी हिल पोलीस चौकीचे भूमीपूजन

नंदुरबार | प्रतिनिधी

 

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते नंदुरबार येथील कोकणी हिल पोलीस चौकीचे भूमीपूजन करण्यात आले.

 

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील हे जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी आजपासून दोन दिवस नंदुरबार येथे आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर पोलीस ठाणे अंतर्गत दुधाळे शिवारातील चौकीचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीतील कोकणी हिल ही दुधाळे शिवारातील वसाहत परिसर असून चोरीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसापासून वाढ झाली आहे. तसेच येथे किरकोळ कारणावरून बऱ्याच वेळा छोटेमोठे वाद होत असतात. या सर्व गोष्टींचा त्रास वयोवृध्द्, महिला, शाळेत जाणारे विद्यार्थी, व्यावसायीक व सामान्य नागरिकांना होत होता. त्यामुळे कोकणी हिल परिसरातील नागरिकांनी याबाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना समक्ष भेटून त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत सविस्तर माहिती दिली होती.

 

 

 

त्यांनी या सर्व बाबींचा आढावा घेवून कोकणी हिल परिसरात पोलीस चौकी उभारणीबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना सांगितले. श्री. कळमकर कोकणी हिल पोलीस चौकी उभारणीबाबत कारवाई करत कोकणी हिल परिसरातील शंकर हरी नगरमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पोलीस चौकी बाबत ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करुन पोलीस चौकी बाबत प्रस्ताव सादर केला. त्यानुसार कोकणी हिल परिसरातील शंकर हरी नगरमधील ३८७३ स्के.फु भुखंडचा ८-अ उतारा ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच व ग्रामस्थ यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त केला. आज दि. १ मार्च २०२३ रोजी पोलीस चौकीच्या जागेचे धार्मीक विधी व परंपरेनुसार पूजा करुन पोलीस चौकी बांधकामाचे भूमीपूजन डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

 

नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीसांची असते आणि पोलीसांना नागरिकांच्या सहकार्याची गरज असते. लोखसंख्या वाढल्यामुळे नवीन वसाहती देखील वाढलेल्या आहेत त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलीस चौकीमुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असे यावेळी श्री. शेखरपाटील यांनी सांगितले.

 

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला पोलीस चौकीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल व लोक सहभागातून पोलीस चौकी उभारणीबाबत बी. जी. शेखर पाटील यांनी भूमीपूजनप्रसंगी दुधाळे गावाचे सरपंच श्रीमती अश्विनी मालचे, ग्रामसेवक दौलत कोकणी, पंचायत समिती सभापती श्रीमती छाया मालचे, प्रतिष्ठीत नागरिक ताराचंद मालचे व सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.

 

 

कोकणी हिल परिसरात जास्तीत जास्त शासकीय कर्मचारी राहत असल्यामुळे सुट्टयांमध्ये शासकीय कर्मचारी आपल्या गावी जात असतात. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. कोकणी हिल पोलीस चौकीमुळे नागरिकांना वेळीच मदत होवून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात मदत होईल असे नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले. कोकणी हिल परिसरात पोलीस चौकीचे भूमीपूजन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या वेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पं.स. सभापती श्रीमती छाया मालचे, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा
Previous Post

रावळपाणी येथे आप समाजातर्फे आज श्रद्धांजलीचे आयोजन

Next Post

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ

Next Post
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली हजार विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add