Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात कामगारांची नोंदणी करणार; विविध योजनांच्या लाभ देण्यासाठी मेळावे घेणार : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
February 27, 2023
in राजकीय
0
शेतकर्‍यांच्या वारसदारांना मदतीचे धनादेश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

नंदुरबार  l

 

कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी  त्यांची नोदंणी करून मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

 

महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यातील बांधकाम कामगांरासाठी अत्यावश्यक व सुरक्षा संचाचे वाटपांचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ.हिना गावित, सरकारी कामगार अधिकारी अ.ज.रुईकर, निरीक्षे वि.प्र.जोगी, वि.रा.झांबरे, ल.प्र.दाभाडे, बा.स.डुकळे यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील बांधकाम कामागारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदीत बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणाऱ्या बांधकाम कामगारांची संख्या अत्यंत कमी असून बांधकाम कामगारांसाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहेत. अशा नोंदणीकृत कामगारांची संख्या वाढवून त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी येत्या काळात कामगार अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन जिल्ह्यात कामगारांच्या नोंदणीसाठी मेळाव्याचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कष्ट करणाऱ्या बांधकाम कामगारांसाठी आता बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना सुरु केली असून या योजनेमार्फत ज्या ठिकाणी कामगार काम करीत असेल अशा ठिकाणी मोफत जेवणांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून  जिल्ह्यातील कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. अंत्योदय  अन्न योजना, प्राधान्य कुटूंबातील शिधापत्रिका धारकांना येणाऱ्या गुढीपाढवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे यात 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी आंनदाचा शिधा देण्यात येणार आहे. तसेच ज्या लोकांना घर नाही अशा व्यक्तिंना विविध योजनेच्या माध्यमातून  घरकुल देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी  मान्यवरांच्या हस्तें नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना अत्यावश्यक सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले.यावेळी

 

जि.प.अध्यक्षा डॉ. सु्प्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्याच्या धनादेशांचे वितरण

राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते तहसिलद कार्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत 28 लाभार्थ्यांना अर्थसहाय्य, 10 लाभार्थ्यांना नविन शिधापत्रिका, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या  लाभार्थी तसेच शेतकरी आत्महत्या अर्थसहाय्य योजनेतंर्गत लाभार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित,तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसिलदार रिनेश गावित, राजेश अमृतकर,भीमराव बोरसे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

समशेरपुर येथील साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली भेट

Next Post

इलेक्ट्रिक मोटारसह पाईप-वायर चोरी

Next Post
आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एकाचा मृत्यू

इलेक्ट्रिक मोटारसह पाईप-वायर चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add