नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील कोठडा येथे झालेल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामना विजेता संघास आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले.
नवापुर तालुक्यातील कोठडा येथे कोठडा ग्रामस्थांच्या वतीने दि. 6 फेब्रुवारी 2023 रोजी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते.या टुर्नामेंटचे उदघाटन आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत माणिकरावजी गावित, युवा नेते धनंजय भरत गावित, कोठडा ग्रा.पं.सरपंच सुरेखा दिलीप कोकणी व उपसरपंच विरसिंग कोकणी यांच्या हस्ते करण्यात आले होते. या टुर्नामेंटमध्ये नवापुर तालुक्यातील क्रिकेट प्रेमी संघांनी सहभाग नोंदवला होता व प्रत्येक संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने खेळाडू वृत्तीने खेळाचा आनंद घेत आपल्या खेळातील कला गुणांचे खुप चांगल्या पद्धतीने प्रदर्शन केले होते.
काल दि.26 फेब्रुवारी रोजी या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामना होता.या अंतिम सामन्यात नवापुर येथील नवापुर वॉरीयर्स व लहान चिंचपाडा येथील प्रिन्स इलेव्हन या दोन संघात सामना रंगला या अंतिम सामन्यात नवापुर येथील नवापुर वॉरीयर्स या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम सामना काबीज करत विजय संपादन केले
.
प्रथम बक्षीस नवापुर येथील नवापुर वॉरीयर्स या विजेता संघाला आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांच्या कडून 15 हजार रु.रोख देण्यात आले तर द्वितीय बक्षीस लहान चिंचपाडा येथील उपविजेता संघ प्रिन्स इलेव्हन यांना कोठडा ग्रा.पं.उपसरपंच विरसिंग कोकणी यांच्याकडून 7 हजार रु. देण्यात आले.
या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंटचा अंतिम सामन्याला भरत गावित, सुरेखा कोकणी, विरसिंग कोकणी, संदीप गावित, राजेश गावित यांच्यासह कोठडा ग्रामस्थ व क्रिकेटप्रेमी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी मनिष मावची, अमित मावची, विशाल कोकणी, अभिषेक मावची, अंकलेश मावची, योसेफ मावची यांनी अथक परिश्रम घेतले.









