Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस निरीक्षकानी अश्लील भाषा वापरल्याचा आरोप, निलंबनासाठी आ.आमश्या पाडवी यांच्यासह विविध संघटनांचा रास्ता रोको

team by team
February 26, 2023
in राजकीय
0
पोलीस निरीक्षकानी अश्लील भाषा वापरल्याचा आरोप, निलंबनासाठी आ.आमश्या पाडवी यांच्यासह विविध संघटनांचा रास्ता रोको

अक्कलकुवा l प्रतिनिधी

अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नवनियुक्त पोलीस निरीक्षक यांनी अश्लील भाषा वापरल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊन त्यांना त्वरित निलंबित करावे या मागणीसाठी संध्याकाळी पोलीस ठाण्यासमोर सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की अक्कलकुवा तालुक्यातील एका गावातील तरुणीला दि. 14 फेब्रुवारी रोजी विशिष्ट समाजातील एका तरुणाने पळवून नेले होते याबाबत तरुणीच्या कुटुंबीयांनी मुलीला फुस लावुन पळविल्याचा आरोप केला होता. मात्र अक्कलकुवा पोलिसांनी हरविल्याची नोंद केली होती. या तरुणीच्या पोलिसांनी तात्काळ शोध लावून सुपूर्त करावे अशी मागणी केली होती याबाबत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.मात्र पोलिसांनी तात्काळ तपास करुन मुलीला ताब्यात देण्याचे आश्वासन दिले होते.म्हणुन तूर्तास आंदोलन स्थगित करण्यात आले. तपासाची गती वाढवून मुलीचा तपास लावून आज दि. 26 रोजी मुलीला कुटुंबीयांच्या सुपूर्त करण्यासाठी नंदुरबार येथे बोलाविण्यात आले होते. मात्र मुलीचे कुटुंबीय तसेच गावचे सरपंच व प्रतिष्ठितांनी मुलीला अक्कलकुवा येथील पोलीस ठाण्यामार्फत पालकांना का सुपूर्त करत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला.

यावेळी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नवीनच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी अश्लील शब्द वापरला. त्यामुळे ग्रामस्थांनी याबाबत निषेध व्यक्त करीत या असभ्य पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात येऊन त्यांना निलंबित करावे.या मागणीसाठी शेवाळी नेत्रंग महामार्गावर संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अडीच तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलना दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर करून योग्य ती कारवाई करतील व यापुढे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकाला चांगली वागणूक दिली जाईल असे आश्वासन दिल्याने रात्री आठ वाजेच्या सुमारास आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी आमदार आमश्या पाडवी, आदिवासी एकता परिषदेचे नागेश पाडवी आदिवासी महासंघाचे किसन महाराज ,हिरामण पाडवी, जे .डी. पाडवी, पंचायत समिती सदस्य जेकमसिंग पाडवी , सरपंच वसंत वसावे ,कान्हा नाईक ,विनोद वळवी, कुवरसिंग वळवी, भूपेंद्र पाडवी , मंगलसिंग वळवी, पृथ्वीसिंग पाडवी ,केतन पाडवी, राजेंद्र वसावे, सुनील राव ,अश्विन तडवी ,विकेश पाडवी, राजू तडवी ,नटवर पाडवी, ॲड .रुपसिंग वसावे आदिंसह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच पीडित मुलीचे कुटुंबीय उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकर्‍यांच्या वारसदारांना मदतीचे धनादेश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

Next Post

राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add