Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीसांनी दाखल न घेतल्याने 25 फेब्रुवारी रोजी खापर चौफुली येथे विविध संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन

team by team
February 24, 2023
in राजकीय
0
पोलीसांनी दाखल न घेतल्याने 25 फेब्रुवारी रोजी खापर चौफुली येथे विविध संघटनांतर्फे रास्ता रोको आंदोलन
अक्कलकुवा l प्रतिनिधी
     दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी दिलेल्या तक्रारीची अक्कलकुवा पोलीस स्टेशनने अद्याप पर्यंत दखल न घेतल्याच्या निषेधार्थ दि.25 फेब्रुवारी रोजी खापर चौफुली येथे आदिवासी महासंघ व इतर संघटनांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याबाबत आदिवासी महासंघाच्या वतीने तहसीलदार अक्कलकुवा यांना निवेदन देण्यात आले आहे.
         याबाबत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील एका गावातील मुलगी  ही ,दि.14 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटेच्या सुमारास कोणालाही काही न सांगता घरातून निघुन गेली.याबाबत मुलीच्या वडीलांनी दि. 15 फेब्रुवारी रोजी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. घटनेच्या अनुषंगाने तक्रार दाखल केली त्याच दिवशी मुलीचे वडील यांनी सदर मुलगीला कोराई येथील एका विशिष्ट समाजातील मुलाने त्याचा गुजरात राज्यातील पाट येथील साथीदाराच्या मदतीने पळवुन  नेल्या बाबत अक्कलकुवा पोलीस स्टेशनला सांगितले होते.
व त्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती देखील पोलिसांना दिली. मात्र घटनेच्या 8 दिवसा नंतर देखील पोलिसांनी या घटने कडे गांभीर्याने न बघता मनमानी पद्धतीने तपास रेंगाळत ठेवला.अनेक वेळा पोलिसांना तपासा बाबत विचारले असता सतत उडवा उडवीची उत्तरे देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे मुलीच्या सुरक्षितते बाबत ग्रामस्थांना काळजी वाटत असल्या कारणाने या घटने संदर्भात मुलाचे  वडील यांना विचारुन मुलगी चा तपास करण्याची विनंती केली. मात्र मुलाचे वडीलांनी सहकार्य न करता उलट जातीवाचक शिवीगाळ करुन धमकावले व पुन्हा विचारणा केली तर जीवे ठार मारण्यात येईल अशीही धमकी दिली असे निवेदनात नमुद केले आहे.
         निवेदनात पुढे नमुद आहे की, सदर प्रकरणात अक्कलकुवा पोलीस हे अत्यंत दुर्लक्ष करीत असुन त्यांच्या निष्काळजी पणा मुळे मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.मुलीचा तपास योग्य पद्धतीने व ग्रामस्थांना विश्वासात न घेता होत असल्याने अक्कलकुवा पोलीस निरीक्षकांच्या विरोधात दि.25 फेब्रुवारी रोजी कोराई चौफुली येथे रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर आदिवासी महासंघाचे तालुका सचिव जी.डी.पाडवी यांच्या सह तालुक्यातील सरपंच व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहया आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

मंदाणेसह परिसरातील गावे जलयुक्त शिवार कार्यक्रम-२ व पाणलोट कार्यक्रम अंतर्गत समाविष्ट करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा

Next Post

कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने फिरणार्‍या दोघांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add