Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र हद्दीलगत रस्ते दुरुस्ती करण्यासाठी गुजरातच्या आमदाराला साद 

team by team
February 21, 2023
in राजकीय
0
महाराष्ट्र हद्दीलगत रस्ते दुरुस्ती करण्यासाठी गुजरातच्या आमदाराला साद 

तळोदा l प्रतिनिधी

 येथील विविध संस्थांमार्फत आमदार, डॉ जयराम गामीत व्यारा बारडोली निझर मतदार संघ (गुजरात) यांना महाराष्ट्र हद्दीलगत गूजराथचे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
                तळोदा- वाका चार -नंदुरबार, तळोदा -सदगव्हाण , प्रकाशा रस्ता नादुरुस्त झाला असून वाहन चालविणे योग्य नाही.म्हणून ग्राहक पंचायत जिल्हा नंदुरबार, प्रदेश प्रवासी महामंच, सहयोग सोसल गृप, व्यापारी महासंघ तळोदा, मेडिकल असोसिएशन तळोदा, डॉक्टर असोसिएशन तळोदा,आदींनी संयुक्त निवेदन दिले आहे.
             निवेदनाचा आशय असा,आम्ही आपणास विनंती करतो की,  नंदुरबार हे जिल्ह्याच्या ठिकाणी असून शाळा, कॉलेज, व्यापार, वैद्यकीय,सुविधा व इतर सरकारी कामांच्या प्रयोजनार्थ तळोदा, धडगाव, मोलगी सह लगतच्या गुजरात राज्यातील जनतेस विविध कार्य प्रयोजनार्थ सदैव जा- ये करावी लागते. मात्र नंदुरबार जातांना गुजरात हद्दीतील रस्ता अत्यंत खराब झालेला आहे मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे कठीण झाले असून गर्भवती महिला आजारी, वृद्ध, विद्यार्थी इ प्रवासींना प्रवास करणे जिकरीचे झाले आहे.खड्ड्यामुळे अपघाताने व आजारांनी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.गुजरात सह महाराष्ट्रातील जनतेची हा रस्ता व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून मागणी आहे जनतेने अनेकदा निवेदन दिले असून,
अनेकदा आंदोलन देखील केले आहे परंतु आश्वासन खेरीज पदरी काही पडलेले नाही. गुजरात व महाराष्ट्र सीमा जवळ जवळ असून औद्योगिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, दळणवळण दृष्ट्या हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे गुजरात राज्यात आपल्या पक्षाचे कल्याणकारी सरकार अस्तित्वात आहे आपल्या सरकारकडून विविध कल्याणकारी विकासाची कामे होत आहेत. तरी आपणास विनंती की या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. या रस्त्याच्या कामी आवश्यकता भासल्यास केंद्र सरकार कडे ही पाठपुरावा अशी आपणास विनंती आम्ही विविध समाज सेवाभावी संघांच्या वतीने करीत आहोत.तरी कृपया आपण तातडीने या निवेदनाची दखल घेऊन रस्त्या कामाची लवकरात लवकर सुरुवात करावी अशी विनंती करण्यात आली आहे.निवेदनावर प्रा संजय शर्मा, रमेशकुमार भाट, अँड अल्पेश जैन,पंडित भामरे, व्यापारी महासंघाचे आनंद सोनार, प्रा आर. ओ .मगरे उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

भुजगाव येथे कुपोषित बालके, स्तनदामाता व गरोदरमातांची तपासणी

Next Post

क्षितिज भंसाली यांचे सी.ए. परीक्षेत यश

Next Post
क्षितिज भंसाली यांचे सी.ए. परीक्षेत यश

क्षितिज भंसाली यांचे सी.ए. परीक्षेत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add