Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोलगी येथील अल्फाबेट प्री स्कूलमध्ये शिवजयंती निमित्त वत्कृत्व स्पर्धा 

team by team
February 21, 2023
in शैक्षणिक
0
मोलगी येथील अल्फाबेट प्री स्कूलमध्ये शिवजयंती निमित्त वत्कृत्व स्पर्धा 
नंदूरबार l प्रतिनिधी
       अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील अल्फाबेट प्री स्कूलला शिवजयंती साजरी करीत यावेळी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय अहिरे व मान्यवर म्हणून प्रा. रविंद्र वानखेडे, ब्रिजलाल पाडवी व डॉ. अजमसिंग वळवी हे उपस्थित होते.
              या कार्यक्रमाच्या सुरुवातीला  शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बार्टीचे समतादूत ब्रिजलाल पाडवी यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यानंतर विद्यार्थ्याची वत्कृत्व स्पर्धा झाली. सदर स्पर्धेसाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेतील पहिल्या गटात प्रथम श्रेयश सुनिल पाडवी व द्वितीय सनिकेत संजय अहिरे तर तृतीय क्रमांक अनुश्री गोविंद पाडवी हिने पटकावला. दुसऱ्या गटात प्रथम हर्ष राकेश जैन व द्वितीय रिषभ किशोर जैन तर तृतीय आरुशी पंकज भोई आणि तीसऱ्या गटात प्रथम उज्वला सरदारसिंग वसावे व द्वितीय रोशनी नामदेव तडवी तर तृतीय क्रमांक दीपमाला संजय खर्डे हिने पटकावला.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी आकर्षकपणे बोलण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय अहिरे यांनी अध्यक्षीय भाषणात विविध विषय हाती घेत मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. रविंद्र वानखेडे यांनी काम पाहिले. व त्यांनी व्यासपीठावरून कसे बोलावे यविषयी मार्गदर्शनही केले. या कार्यक्रमास माजी सरपंच शीतलताई पाडवी, ॲड. सरदारसिंग वसावे व सलीम पिंजारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोटूसिंग वळवी तर आभार ईश्वर वसावे यांनी मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

रंजनपूर येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत आरती पूजन 

Next Post

भुजगाव येथे कुपोषित बालके, स्तनदामाता व गरोदरमातांची तपासणी

Next Post
भुजगाव येथे कुपोषित बालके, स्तनदामाता व गरोदरमातांची तपासणी

भुजगाव येथे कुपोषित बालके, स्तनदामाता व गरोदरमातांची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add