नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रंजनपूर येथे आरती पूजन सोहळा संपन्न झाला.या सोहळ्याला हजारो भाविकांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपली उपस्थिती दर्शविली.
तत्पूर्वी ११ फेब्रुवारी १९३७ साली संत गुलाम महाराज यांच्या माध्यमातून आरती पूजन मूळ धर्माची स्थापना करण्यात आली. त्या दिवशी महाशिवरात्री होती त्या दिवसापासून म्हणजे ८६ वर्षा पासून आरती पूजनाचा कार्यक्रम संत गुलाम महाराज यांच्या वंशजांनी आजपर्यंत सुरू ठेवला आहे. त्यात नंदुरबार जि.प.चे माजी सदस्य जितेंद्र पाडवी यांचा समावेश आहे.
१९३८ साली संत गुलाम महाराज शांत झाले.त्यानंतर त्यांचे वंशज संत रामदास महाराज यांच्याकडे गादी सोपविण्यात आली. दर सोमवारी सर्व महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशचे भाविक मोठ्या प्रमाणावर रंजनपुर येथे येत असल्याने ब्रिटिश सरकारने आरती वर बंदी घातली व संत रामदास महाराजांना हद्दपार केले.संत गुलाब महाराज, संत रामदास महाराज हे व्यसनमुक्तीचे संदेश देत असे रंजनपुर येथे चार वेळा आरती पूजन होत असे त्यात महाशिवरात्री, दीपावली, आषाढी एकादशी व वंद्य सप्तमी या दिवशी महाआरती होत असते. संत रामदास महाराज १९६० साली शांत झाल्यानंतर त्यांच्या त्या गादीवर चंद्रसेन महाराज विराजमान झाले ते आजपर्यंत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाविक रात्री आरती घेऊन चंद्रसेन महाराज यांच्या घरून रात्री आठ वाजता निघाले असता दिव्यांच्या लखलखाट रात्री १२ वाजता संत गुलाब महाराज यांच्या समाधीस्थळी पोहचले व आरती पूजन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी त्या ठिकाणी किसन महाराज, हिरामण पाडवी ह्यांनी व्यसन मुक्तीच्या संदेश उपस्थित सर्व भाविकांना दिला. कोणी दारू पिऊ नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, आपसात भांडण करू नये, व्यसनापासून दूर राहावे असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आमदार राजेश पाडवी,आमदार आमशा पाडवी, राजेंद्रकुमार गावित.,तळोदा तालुका भाजप प्रकाश वळवी, नारायण ठाकरे, जि.प.सदस्य जितेंद्र पाडवी, सुनीता पवार इत्यादी सह लाखो भाविक यांच्या सह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
या आरती पूजनाला महाराष्ट्र, गुजरात ,मध्यप्रदेश राज्यातील लाखो भाविक उपस्थित होते. यामुळे रंजनपुर गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. भाविक उपस्थित राहणार असल्याने जि. प. सदस्य जितेंद्र पाडवी, जि. प. सदस्य पार्वती पाडवी, नारायण ठाकरे सरपंच अक्षता वळवी ,प्रवीण वळवी,वासुदेव पाडवी ,पोलीस पाटील अशोक पाटील यांनी पूर्वतयारी करून ठेवली होती.
रात्री १२ वाजता संत गुलाब महाराज यांच्या समाधीवर आरती पूजन व संदेश मुक्त उपदेश झाल्यानंतर सर्व भाविक संत गुलाब महाराज यांच्या घरी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी गेले.व सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आता संत गुलाब महाराजांच्या गादीवर संत चंद्रसेन महाराज विराजमान झाले आहेत ते त्यांच्या वारसा पुढे चालवीत आहेत.