Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सीहोरहुन परतताना गाडीचा भीषण अपघात, दोघा महिलांचा जागीच मृत्यू

team by team
February 17, 2023
in क्राईम
0
सीहोरहुन परतताना गाडीचा भीषण अपघात, दोघा महिलांचा जागीच मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी

 

मध्य प्रदेश राज्यातील सीहोर येथे आयोजीत करण्यात आलेल्या शिवमहाकथापुराण महोत्सवाला प्रचंड गर्दी झाली होती. रुद्राक्ष महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाल्याने मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. अनेक जण बेपत्ता असतानाच आज पहाटे जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या वाहनाचा मध्यप्रदेशात अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली.यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.

 

मध्य प्रदेश मधील सीहोर येथे शिवमहाकथापुराण कथा व रुद्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांची मोठी गर्दी पाहून पंडित प्रदीप मिश्रा यांनी बुधवारी रुद्राक्षांचे वितरण सुरु केले होते. समितीने 20 काउंटर्सच्या मदतीने भाविकांना रुद्राक्ष वाटले. बुधवारी सायंकाळपर्यंत जवळपास दीड लाख रुद्राक्षांचे वाटप झाले होते.

 

 

 

काल गुरुवार रोजी रुद्राक्ष घेण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाल्याने मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील मंगलाबाई कांडेकर यांचे निधन झाले.तर बुलढाण्याच्या एका महिलेसह 3 महिला भाविक बेपत्ता झाल्या आहेत.दरम्यान या महोत्सवाला मध्य प्रदेश व महाराष्ट्रासह, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, गुजरात आदी देशाच्या विविध राज्यातून भाविक येत आहेत. बुधवारी कुबेरेश्वर धाम महादेवाच्या दर्शनासाठी 2 किमी लांब रांग लागली होती.गुरुवारी सकाळची कुबेरेश्वर धाम ते इछावर रोडपर्यंत 17 किमी लांबीचा जाम होता. सीहोर ते इंदूरच्या दिशेने 27 किमी व भोपाळच्या दिशेने 10 किमी लांबीच्या महामार्गावरही जाम होता.

 

 

 

गर्दीमुळे मोबाईल नेटवर्कवरही ताण आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच मध्यप्रदेशात जुलवानिया गावाजवळ ( MH १९ DV ६७८३) इको गाडीचा अपघात झाला.यात अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला शोभाबाई लुकडू पाटील (वय ५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय ५५) यांचा सिहोर हुन घरी परत येत असताना जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१७ रोजी सकाळी घडली.
दरम्यान रुद्राक्ष वाटप व कथेचे समापन करण्यात आल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी जाहिर केले.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपातर्फे आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी शिबिर

Next Post

ब्रेकिंग न्यूज : उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाले ‘धनुष्यबाण’,निशाणी व शिवसेना नावही

Next Post
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

ब्रेकिंग न्यूज : उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का एकनाथ शिंदेंच्या पक्षाला मिळाले 'धनुष्यबाण',निशाणी व शिवसेना नावही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add