नंदुरबार l प्रतिनिधी

स्टॅच्यू ऑफ युनिटी (एकतेचे प्रतीक असलेला पुतळा) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा गुजरात राज्यातील राजपिपला शहराजवळ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणासमोरील साधू बेटावर उभारलेला १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळ्यास भेट दिली .
येथील स्वा. सै. श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्या मंदिराची ऐतिहासिक सहलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. सहलीचे आकर्षण ठरले ते जंगल सफारी आणि प्राणी संग्रहालय. ३७५ एकर परिसरात पसरलेल्या २९ मीटर ते १८० मीटर अशा वेगवेगळ्या उंचीच्या सात स्तरांमध्ये रचना केलेल्या जंगल सफारीत शंभरहून अधिक जातीचे अकराशेहून अधिक पक्षी, प्राणी आणि पाच लाख झाडे आहेत. मोर, वाघ सिंह , ब्लॅक पँथर असे विविध प्राणी पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. सहलीत १०८ चौथीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता .सरदार सरोवर धरणावर असलेली विशेष रोषणाई विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.
तसेच पोईचा येथील नीलकंठ धाम स्वामी मंदिरातील महादेवाची नटराज स्वरूपातील भव्य मूर्ती व अत्यंत आकर्षक असलेल्या त्या भोवतालचा परिसर दाखविण्यात आला. सहलप्रमुख सतीश पाटील, तुषार सोनवणे, मनोज वानखेडे, मीना अहिरे हरीश चौधरी, अशोक सोनार, नितेश नाथजोगी ,विनोद बोरसे,राहुल सूर्यवंशी ,दीपिका शाह, दिपश्री माळी, शितल अजबे इत्यादी शिक्षक तसेच रंजना तांबोळी, मनीषा शिंपी उपस्थित होते. प्रमोद खैरनार, वंदना देवरे, श्री. माळी, श्री.बागुल यांनी सहकार्य केले.
सहलीत सहभागी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गाणी गाऊन ,नृत्य , नकला करून मनोरंजन केले. विद्यार्थ्यांना भरभरून आनंद दिला. मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्याचे काम सहलीमुळे झाले याचे समाधान व्यक्त करणार्या प्रतिक्रिया पालकांनी लेखी स्वरूपात दिल्या.प्रा गणेश पाटील, दिनेश पाटील ,गोपाळ महाजन, गीता महाजन, संदीप पाटील, परिधी इत्यादी पालकांनी अतिशय स्तुत्य व शिस्तबद्ध बाळगोपाळांच्या आयुष्यातल्या अविस्मरणीय अशा आठवणीत राहतील अशा सहलीतील नियोजनाबद्दल शिक्षक,मुख्याध्यापिका यांचे लेखी स्वरूपात कौतुक केले. चौथीची विद्यार्थ्यांनी समता गोपाळ महाजन याने सहलीचे क्षणचित्रे ,व्हिडिओ दाखवून वृत्तांत इंग्रजीत सांगितला. सहलीहून परत आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात पालकांनी स्वागत केले. सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ऍड. रमणभाई शाह, सचिव डॉ. योगेश देसाई ,मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे यांनी शुभेच्छा दिल्या.









