Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या

तीन वर्षांपासून विनापगार सेवा: पोलीस प्रशासनाकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी

team by team
February 13, 2023
in क्राईम
0
अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या
मोलगी  l प्रतिनिधी
अंगणवाडी सेविकेला पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांने त्या सेविकेला नेहमीच त्रासही दिला. त्या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
         धडगाव तालुक्यातील जुगणीचा हिरीचापडा या पाड्यावरील अंगणवाडी केंद्रात तेथीलच रहिवासी अलका अमिताभ वळवी ( वय ३३) ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती. तिला तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता, पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर पगारे व विस्तार अधिकारी पंकज बोरसे यांनी तिला मानसिक त्रास दिला. एवढेच नव्हे तर गावातील लोकांना चिथावणी देत त्यांनाही त्रास द्यायला लावला.
         अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा  त्रास व गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ जोमा वळवी यांनी केली आहे.
अमृत आहारासाठीही खाजगी खर्च-
     सेवेचा कुठलाही मोबदला मिळत नसल्याने अनेक वर्षांपासून गरिबीशी दोन हात करणाऱ्या मयत अलका वळवी हे अंगणवाडी केंद्रातील बालकांना अमृत आहार देखील खाजगी खर्चातून पुरवठा करीत होते. अशाप्रकारे आर्थिक बोजा वाढत होता, त्यातच  अधिकाऱ्याचा त्रास, अशामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे कळते.
  मिटींग ठरली अखेरची-
       एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांसाठी तोरणमाळ येथे मिटींग घेण्यात आली. ही मिटींग करुन गावाकडे परत येत असताना अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली, त्यामुळे ही मिटींग तिच्यासाठी अखेरची ठरली.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे आज जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन 

Next Post
प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन 

प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या कार्य अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add