Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा :जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना; नागरिकांना अर्ज व निवेदने स्थानिक स्तरावर देता येणार

team by team
February 10, 2023
in राज्य
0
अरे व्वा :जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना; नागरिकांना अर्ज व निवेदने स्थानिक स्तरावर देता येणार

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने, संदर्भ यामध्ये अधिक लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 20 डिसेंबर,2022 पासून जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला असून नागरिकांना आपली निवेदने व अर्ज थेट या कक्षात देता येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिवांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे गृह शाखेच्या कक्षात जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षासाठी पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष म्हणून सुधीर खांदे, नायब तहसिलदार (महसूल ) राजेंद्र चौधरी, महसूल सहायक सुरेश अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कक्षात सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी स्विकारण्यात येवून त्याची पोचपावती संबंधित अर्जदारास देण्यात येईल. ज्या प्रकरणात जिल्हास्तरावरुनच कार्यवाही होणे अपेक्षित आहे. अशा प्रकरणांचा निपटारा जिल्हास्तरावरच करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कक्षामध्ये शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या आस्थापनाविषयक बाबींवरील तसेच अर्धन्यायिक स्वरुपाची अपेक्षित असलेले अर्ज, निवेदने दाखल करणे अभिप्रत नाही. कक्षात प्राप्त झालेल्या अर्ज, निवेदनांवर संबंधित विभागाचा आढावा हा प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिना नंतर घेण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूरच्या ट्रामा केअर सेंटरमुळे अपघातग्रस्तांना त्वरीत मिळणार उपचार: पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात, प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे माणुसकीचे दर्शन

Next Post
उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात, प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे माणुसकीचे दर्शन

उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात, प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे माणुसकीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add