Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे आज समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने बोगस आदिवासींच्या विरोधात जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन

team by team
February 10, 2023
in राजकीय
0
नंदुरबार येथे आज समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने बोगस आदिवासींच्या विरोधात जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी बांधवांच्या विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमाने 10 फेब्रुवारी रोजी. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर बोगस आदिवासी विरोधी निर्णय व धनगर आरक्षण तसेच आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांना घेऊन. महाराष्ट्र शासनाच्या विरोधात जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीला शासकीय व निम शासकीय सेवेत दिलेल्या आरक्षणाचा लाभ. अनुसूचित जमातीचे नसलेले व्यक्ती बोगस आदिवासीच्या नावाखाली नोकरीमध्ये लाभ घेत असून. अशा नोकरदारांना महाराष्ट्र शासनाने वारंवार परिपत्रके काढून संरक्षण दिलेले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील बोगस आदिवासींचा दावा अवैध ठरवून. त्यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्याकडून घेतलेल्या लाभाची वसुली करावी असा निर्णय दिला असतानाही. महाराष्ट्र शासन माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच संपूर्ण आदिवासी समाजाच्या विरोधात निर्णय घेऊन बोगस आदिवासींना संरक्षण देत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे आदिवासी समाजावर मोठा अन्याय होत आहे. शासनाने बोगस आदिवासी विरोधात घेतलेला निर्णय मागे घ्यावा.
यासाठी 10 फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातून समस्त आदिवासी बांधवांच्या विविध संघटनांद्वारे. महाराणा प्रताप चौक येथून भव्य जनाक्रोश महामोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या महामोर्चात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित राहणार असून शासनाला जाब विचारणार आहे. शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला बोगस आदिवासी विरोधात निर्णय अत्यंत चुकीचा असून सदर निर्णय मागे घ्यावा. मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा संबंधित आदिवासी संघटनांनी दिला आहे. सदर जन आक्रोश महामोर्चात जिल्ह्यातील आमदार, खासदार, आदिवासी लोकप्रतिनिधी तसेच नाशिक जिल्ह्यातील आमदार श्री. निकोले  देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून जन आक्रोश महामोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी निवृत्त अधिकारी समाज कल्याण उपायुक्त अरविंद वळवी, मंत्रालय निवृत्त अधिकारी सदानंद गावित, डॉक्टर भरत वळवी, बटेसिंग वसावे, मालती वळवी, जयसिंग माळी, अणेश वळवी, कृष्णा गावित, मोहन वसावे आदी आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित माहिती देण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

सोरापाडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात युवतीची छेड काढण्यावरून झाला वाद

Next Post

छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तात्पुरती सिडी बसविण्यात यावी , इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनची मागणी

Next Post
छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तात्पुरती सिडी बसविण्यात यावी , इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनची मागणी

छ.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तात्पुरती सिडी बसविण्यात यावी , इस्माईल दगू जनसेवा फाऊंडेशनची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add