Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खेतिया येथील कॉटेक्स जिनींगमध्ये चोरट्यांचा डल्ला, 12 लाखाची रोकड लंपास

team by team
February 8, 2023
in क्राईम
0
खेतिया येथील कॉटेक्स जिनींगमध्ये चोरट्यांचा डल्ला, 12 लाखाची रोकड लंपास
खेतिया । वार्ताहर
येथील पानसेमल रोडवरील संचेती कॉटेक्स जिनींगमध्ये अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री 12.30 ते 1.30 च्या दरम्यान प्रवेश करून जिनींगच्या ऑफिसमधील तिजोरी  खोलीमधून ढकलत आणून जवळच असलेल्या इन्होवा कारमध्ये तिजोरी टाकून चोरटे पसार झाले. या तिजोरीमध्ये 12 लाखाच्या वर रोकड होती. श्रीखेड ते कुरंगी रस्त्यावर सदर रोकड लंपास करुन वाहन व तिजोरी रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
येथील संचेती कॉटेक्समध्ये काल अज्ञात चोरट्यानी मध्यरात्री 12.30 ते 1.30 च्या सुमारास जिनींगमध्ये प्रवेश केला. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकास हत्याराचा धाक दाखवून ऑफिसमध्ये शिरून 3 क्विंटल वजनाची तिजोरी ताब्यात घेतली. या तिजोरीमध्ये 12 लाख रूपयांची रोकड होती. चोरट्यानीं तिजोरीला ढकलत आणून ओट्यावर ठेवली. जवळच उभ्या असलेल्या इन्होवा कार (क्र.एमपी09 सीएन 9957) ही कार ढकलत आणून ओट्याजवळ उभी केली. ऑफिसमध्ये असलेल्या कीबोर्ड जवळ गाडीची चावी काढून गाडीला लाउन गाडीच्या मागचा दरवाजा उघडुन त्यात तिजोरी ठेवली. व चोरटे पसार झाले.
संबंधित सुरक्षा रक्षकाने ताबडतोब घटनेची माहिती संचेती कॉटेक्सचे मालक दिलीपकुमार पाबुदान संचेती यांना दिली. त्यांनी घटनेची माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलीस निरीक्षक छगनसिंह बघेल व त्यांचे सहकारी फौजफाट्यासह जिनींग परिसरात पोहोचले. तोपर्यंत अज्ञात चोरटे पसार झाले होते. यावेळी तात्काळ नाकाबंदी करून सर्चिंग ऑपरेशन सुरू केले. यावेळी जिनींग परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी केली असता चोरट्यांचे सर्व कारनामे रेकार्ड झाले असून त्यात एकुण 5 चोरटे दिसून आले.
गाडी कोणत्या दिशेला गेली ते पाहुन पोलिस यंत्रणा कामाला लागली. खेतियापासून 3 कि.मी.च्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील श्रीखेड ता. शहादा या गावाजवळ श्रीखेड ते कुरंगी रस्त्यावर 300 मीटरच्या अंतरावर शेतामध्ये बेवारस तिजोरी व थोड्या अंतरावर इन्होवा गाडी नागरिकांना उभी दिसली. गावातील पोलिस पाटील राजेश दिवाण पटले यांनी खेतिया व म्हसावद पोलिसांना माहिती दिली.
त्यावेळी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक छगनसिंह बघेल व त्यांचे सहकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बडवानी जिल्हयाचे पोलिस अधिक्षक दीपककुमार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक रोहितसिंह अलावा व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी बडवानी येथील श्वान पथक व ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने चोरट्यांचा श्रीखेड ते कुरंगी रस्त्यावरील नाल्यापर्यंत माग काढला. ठसेतज्ञांनी तिजोरीवरील फिंगरप्रिंट घेउन पाहणी केली. यावेळी म्हसावद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार, ए.एस.आय. प्रदिपसिंह राजपूत, हेड काँस्टेबल घनश्याम सुर्यवंशी, पोलिस काँस्टेबल कलिम रावताळे, यांनी पाहणी केली.
या घटनेमुळे खेतिया कापूस व्यवसाय आणि जिनींग व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. संचेती कॉटेक्सचे मालक दिलीप संचेती यांनी सांगितले की दररोज कपाशीच्या खरेदीसाठी पैशांची देवाणघेवाण सुरू असते. त्यामुळे तिजोरीमध्ये 12 लाखाच्यावर रोकड होती. परंतु अज्ञात चोरट्यानी तिजोरीसह रोखरक्कम लंपास केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना

Next Post

हरणखुरी गावात वराहांचा हैदोस शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान

Next Post
हरणखुरी गावात वराहांचा हैदोस शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान

हरणखुरी गावात वराहांचा हैदोस शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add