Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना

team by team
February 8, 2023
in राज्य
0
महावितरण अधिकाऱ्यांमध्ये रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना

जळगाव l

 

महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जळगावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेदरम्यान महावितरणचे सांघिक कार्यालय तसेच कोकण प्रादे‍शिक कार्यक्षेत्रातील ‍ वरिष्ठ  अधिकाऱ्यांच्या संघांत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला क्रिकेट सामना बरोबरीत सुटला.

 

 

 

 

          अनुभूती प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या मैत्रीपूर्ण सामन्यात सांघिक कार्यालयाचे नेतृत्व संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी तर कोकण प्रादे‍शिक संघाचे नेतृत्व सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले. कोकण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ‍नितीन आव्हाड (व्यवस्थापक- वित्त व लेखा) यांच्या शानदार अर्धशतकाच्या (23 चेंडूत नाबाद 53 धावा) जोरावर कोकण संघाने निर्धारित 12 षटकांत 3 बाद 113 धावा केल्या. आव्हाड यांना मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी 7, कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी 10, सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी 4, व्यवस्थापक (वित्त व लेखा) योगेश अमृतकर यांनी 10, जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर आर्दड यांनी 8, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात यांनी 2 व अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांनी 7 धावा काढून धावसंख्या वाढवण्यास मदत केली. 12 धावा अतिरिक्त निघाल्या. सांघिक कार्यालयातर्फे संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी 2 षटकांत 15 धावा देऊन 1 गडी बाद केला तर मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी 2 षटकांत 14 धावा देत 2 गडी बाद केले.

 

 

 

 

          प्रत्युत्तरात सांघिक कार्यालयाने सलामीवीर प्रसाद महातोळे (कार्यकारी अभियंता) यांच्या नाबाद 46 धावांच्या जोरावर 113 धावांचे आव्हान गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सांघिक कार्यालयास शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज होती. पहिल्या 5 चेंडूत 1‍0 धावा निघाल्या. शेवटच्या चेंडूवर 3 धावांचे लक्ष्य असताना 2 धावा निघाल्याने रोमहर्षक अवस्थेत अखेर सामना बरोबरीत सुटला. सांघिक कार्यालयाच्या वतीने महाव्यवस्थापक (मानव संसाधन) राजेंद्र पांडे यांनी 18, संचालक (प्रकल्प तथा मानव संसाधन) प्रसाद रेशमे यांनी 7, कार्यकारी अभियंता चेतन वाडे यांनी 14, मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी 10, कार्यकारी अभियंता धीरज चव्हाण यांनी 8 तर प्रणाली विश्लेषक विक्रांत इंगळे यांनी 2 धावा काढल्या. कोकण संघातर्फे व्यवस्थापक (वित्त व लेखा) योगेश अमृतकर यांनी 3 षटकांत 23 धावा देत 2 गडी बाद केले तर उपमुख्य औद्योगिक संबंध ‍अधिकारी रामगोपाल अहिर यांनी 2 षटकांत 15 धावा देत 1 गडी बाद केला.

 

 

 

 

          सांघिक कार्यालयाच्या वतीने कार्यकारी संचालक (वि‍तरण तथा मानव संसाधन‍) अरविंद भादीकर, मुख्य अभियंता प्रवीणकुमार परदेशी, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश कोहाट, अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर, प्रणाली विश्लेषक संतोष डोंबाळे, उपविधी अधिकारी सुमेध कोलते, कार्यकारी अभियंता योगेश वारके, कार्यकारी अभियंता नीलेश सोनगिरे व कार्यकारी अभियंता ओम भेंडे यांनीही सामन्यात सहभाग घेतला. तर कोकण प्रादे‍शिक संघातर्फे मुख्य अभियंता सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा) देवेंद्र सायनेकर, उपमुख्य औद्योगिक संबंध ‍अधिकारी प्रमोद राजेभोसले, अप्पासाहेब पाटील, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, विशाल ‍शिवतरे, रामचंद्र चव्हाण, धनराज बिक्कड, कैलास लव्हेकर, अनिल महाजन, धनंजय आहेर, व्यवस्थापक (मानव संसाधन) योगेश्वर पाडवी यांनी सामन्यात सहभाग नोंदवला.

          हा सामना पाहण्यासाठी औरंगाबाद प्रादे‍शिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले, जळगाव ‍ परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी ललित गायकवाड यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तसेच जळगावचे  क्रिकेटप्रेमी ‍नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुभूतो शाळेचे क्रीडा संचालक अरविंद देशपांडे यांनी सामना संयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवा सुरू

Next Post

खेतिया येथील कॉटेक्स जिनींगमध्ये चोरट्यांचा डल्ला, 12 लाखाची रोकड लंपास

Next Post
खेतिया येथील कॉटेक्स जिनींगमध्ये चोरट्यांचा डल्ला, 12 लाखाची रोकड लंपास

खेतिया येथील कॉटेक्स जिनींगमध्ये चोरट्यांचा डल्ला, 12 लाखाची रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add