Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री. संत सेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

team by team
February 7, 2023
in राजकीय
0
श्री. संत सेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
शहादा  l  प्रतिनिधी
समस्त गुजर नाभिक समाज पंच शहादा नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री. संत सेना समाज सेवा मंडळ शहादाच्या वतीने दि. १० फेब्रुवारी रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
       शहादा येथील शहादा तालुका खरेदी विक्री संघ प्रांगणात शुक्रवार दि.१० फेब्रुवारी ,  रोजी सकाळी १०:३० वाजता समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ व श्री सतसेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा समाजाचा ८ वा व श्री. संत सेना समाज सेवा मंडळाचा वतीने द्वितीय  सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. केवळ नाममात्र एकवीस रुपयात वर – वधुंची  नाव नोंदणी केली जात असून आतापर्यंत २२ उपवर –  वधू म्हणजे ११ जोडप्यांची नोंदणी झाली आहे. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दि. ९ फेब्रुवारी रोजी  दुपारी १ वाजता हळद, सार्थक ,पुजाविधी , भोजन, रात्री रासगरबा व दि. १० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता नवरदेवांची शोभायात्रा  मिरवणूक अंबाजी माता मंदिर खेतिया रोड पासून खरेदी विक्री संकुल पर्यंत निघणार आहे. सकाळी १०:३० वाजता सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे.
             या सोहळ्यात वर – वधु पालकांची स्वतंत्र बैठक व्यवस्था, धार्मिक विधीसाठी स्वतंत्र पुरोहित, फोटोग्राफर व्हिडिओ चित्रीकरण विविध संसार उपयोगी साहित्य वितरण विवाह नोंदणी प्रमाणपत्र वितरण ,  वाजंत्री   समाज प्रथे प्रमाणे  हळद, नवग्रह शांती यज्ञ , पेहरावणी , पाणेतर , सत्यनारायण कथा ,  विदाई आदी सर्व विधी भोजनावळ,  स्वतंत्र मंडप, विवाह पत्रिका ,वर- वधू व पालकांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था, फिरते शौचालय, मंडपात सी. सी. टि. व्ही.  कॅमेरा , ड्रोन कॅमेरा , वॉकी टॉकी , डॉक्टर , प्रथमोपचार कक्ष ,  रुग्णवाहिका , अग्निशामक बंबाची गाडी , मोठा एल. ई. डी.  टि. व्ही. संच , विविध प्रकारच्या सामाजिक माध्यमांवर सरळ प्रक्षेपण  आदी सुविधा आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्यात नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी वधू मातेस महिला व बालकल्याण विभागाच्या कन्यादान योजनेच्या माध्यमातून १०,००० रुपयांचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बेटा बेटी एकसमान ,  बेटी बचाओ बेटी पढाओ, अन्न , पाणी वाचवा असा संदेश देणारी जनजागृतीपर बॅनर लावण्यात येणार आहेत.
हळद समारंभ , बिदाई ते सत्यनारायण कथा असा दोन दिवस चालणारा हा परिसरातील एकमेव आगळा वेगळा विवाह सोहळा आहे.  या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्र , गुजरात आणि मध्य प्रदेश आदी राज्यातील चार ते पाच हजार समाज बांधव व आप्तेष्ट उपस्थित राहण्याची शक्यता आहे तसेच राजकीय, सामाजिक , आर्थिक , सहकार , विविध प्रसार माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यातील भोजनावळीकरिता अनेक दानशूर दात्यांनी अन्नदानासाठी मदत करीत आहेत. याकामी समाजातील विविध संस्था, संघटना, तरुण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभणार आहे , या सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, संचालक, समाज पंच मंडळ व विविध संघटना अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

भुजगाव ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्ह्यातील समाजकार्य महाविद्यायाच्या विद्यार्थ्यांची भेट

Next Post

कमला नेहरू महाविद्यालयाचे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश

Next Post
कमला नेहरू महाविद्यालयाचे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश

कमला नेहरू महाविद्यालयाचे विभागस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत नेत्रदीपक यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add