नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणारे हरणखुरी गावात यवतमाळ जिल्ह्यातील महात्मा ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे एम.एस.डब्लू. भाग २ च्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सहल निमित्ताने भेट घेतली.

या अभ्यास भेटी दरम्यान हरणखुरी गावात झालेल्या विविध विकासकामे, पर्यावरण संवर्धन,जल माती आणि मोर संवर्धनाची कामे पाहली. गावात सुरु असलेल्या पारंपारिक बियाणे संवर्धन बँकेला विशेष भेट दिली. या दरम्यान भूजगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अर्जुन पावरा यांचे गावविकास कामे करत असतांना आलेल्या अनुभव जाणून घेतले. भूजगाव ग्रामपंचायत प्रशासनात जनतेचा सक्रीय सहभाग वाढविण्याठीस ग्रामपंचायतीने सुरु केलेल्या पाडा विकास कमिटीची संकल्पनेवर सर्वात जास्त चर्चा झाली त्यात विध्यार्थ्यानी जास्तीचा रस दाखविले. तसेच आदिवासी चालीरिती रूढी परंपरा,सण उत्सव,वेशभूषा याबाबतीत अभ्यास केला प्रसंगी राकेश पावरा,प्रमोद पावरा,दीपक पावरा, कल्पेश पावरा, किरण पावरा,राखी पावरा आणि ग्रामरोजगार सेवक सुभाष पावरा उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
हरणखुरी गावात मागील पाच ते सहा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर अभिनव उपक्रम राबविले जात आहेत ही सर्व कामे सामाजिक बांधालकीतून होत आहेत, ज्यात माझ्यासह हरणखुरी गावातील तरुणांची सर्व टीम काम करत आहेत, हि सर्व कामे ग्रामस्तरावर कशा रीतीने हाताळली जात आहे तसेच आदिवासी संकृतीची माहिती विद्यार्थ्यानी घेतली.अर्जुन पावरासरपंच ग्रामपंचायत भूजगाव.
यवतमाळ येथून समाजकार्य महाविद्यालयाचे एम.एस.डब्लू. भाग २ च्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सहल दरम्यान हरणखुरी येथील विकासकामांची माहिती घेण्यासाठी आली. हि ग्रामपंचायतीसाठी आनंदाची गोष्ट असून सुरवात चांगली झाली आहे. याचे सर्व श्रेय तरुण सरपंच आणि त्यांच्या तरुणांच्या टीमला जाते.
– एच.आर,वंजारी,
ग्रामसेवक भूजगाव








