नंदूरबार l प्रतिनिधी
बोरद येथे आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते धेर्यशील फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड व जैतोबा क्लीनफ्युएल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने एम. कोल. प्रकल्पाचा भूमिपूजन करण्यात आले.
हा प्रकल्प २.५ एकर जागेवर साकारला जाणार असून या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतातुन वाया जाणार चारा तसेच केळीचे खांब तसेच ऊस ,गहू यांचा उर्वरित चारा जो शेतकरी जाळून टाकत असतात यांच्या मार्फत जैविक कोळसा उत्पादित केला जाणार आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांना गवत लागवडीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.जेणे करून शेतकरी स्वावलंबी होतील व शेंद्रिय शेतीद्वारे आपले उत्पादन वाढवू शकतील.या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना शेंद्रिय खत देखील पुरविले जाणार आहे.जेणे करून भविष्यात हा परिसर रासायनिक खत मुक्त होईल.
अशा शेतकरी हिताच्या विविध बाजू अधोरेखित करून कंपनीने सीएनजी व पीएनजी प्रकल्प देखील या परिसरात राबविणार असल्याने पुढे जाऊन परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
अश्या या बहुचर्चित प्रकल्पाचे उद्घाटन शहादा तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कंपनीचे एमडी सोपान खैरनार तसेच मनोज कुमार पाटील,विठ्ठल बागले तुळाजा येथील भरत पवार,करडे येथील गोपी पावरा तसेच बोरद येथील मंगेश पाटील,संजय ठाकरे, रविन भिलाव,साजन शेवाळे,गौतम भिलाव,विठ्ठल ढोडरे,मोड येथील प्रवीण राजपूत त्याच बरोबर परिसरातील सरपंच, सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना विद्याताई पवार यांनी केली तर सूत्रसंचालन संदीप ढोले यांनी केले तर आभार विनोद साळुंके यांनी मानले.