नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीचे महासचिव तथा सिंदबन येथील ग्रा.पं.सदस्य राजेंद्र पवार यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.
अक्कलकुवा येथील आमदार आमशा पाडवी यांच्या कार्यालयात शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हाप्रमुख आ.आमशा पाडवी, उप जिल्हाप्रमुख के.टी.गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पवार यांच्यासह दिनेश कोकणी, अभिमन सुर्यवंशी, गणेश कोकणी, बिपीन कोकणी आदींनी प्रवेश उद्धव गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे दिपक गवते, जिल्हा संघटक अरुण वाडीले, समाज कल्याण सभापती शंकर आमशा पाडवी, युवासेनेचे ललित जाट आदी उपस्थित होते.
राजेंद्र पवार हे मागील पंधरा वर्षापासून आदिवासी संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजात संघटनात्मक कार्य करीत आहेत. ते आदिवासी बचाव अभियान, नाशिकचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष असून डोंगर्यादेव माऊली संघर्ष समितीचे महासचिव आहेत. नुकत्याच झालेल्या सिंदबन ग्रामपंचायत निवडणुकीत ते बिनविरोधी सदस्य म्हणून निवडून आले आहेत.








