Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

Mahesh Patil by Mahesh Patil
January 23, 2023
in राष्ट्रीय
0
‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ

नवी दिल्ली l प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे. येथील छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे.

 

येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर सादर होणाऱ्या चित्ररथाविषयी पत्रकार परिषद झाली. यावर्षी महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे १० असे २७ चित्ररथ कर्तव्यपथावर दिसणार आहेत.

 

असा असेल महाराष्ट्राचा चित्ररथ

महाराष्ट्राचे यापूर्वी ४० चित्ररथ सहभागी झाले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सहभागी होणार आहे. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

 

 

महाराष्ट्र संताची आणि देवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात महत्त्वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे आहेत. कोल्हापूरची आंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्धे शक्त‍िपीठ आहे. या शक्तिपीठांना स्त्री शक्त‍िचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आले आहे.

 

चित्ररथाच्या पुढील दर्शनिय भागास गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे. समोरील डाव्या व उजव्या भागास पांरपारिक वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींच्या प्रतिमा आहेत. यामागे पोतराज आणि हलगी वादकांच्या दोन प्रतिकृती असतील. त्यांच्या समोरील भागात लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा दिसणार आहे. अशी माहिती श्री चवरे यांनी यावेळी दिली.

 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” हे गीत असेल. यासोबतच कर्तव्यपथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे कलाकार नृत्य सादर करतील. या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे.

 

आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक
प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली येथील छावणी परिसरातील रंगशाळेत आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळाले. महाराष्ट्राने धनगरी नृत्य या लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यास मिळाला तर तृतीय क्रमांक झारखंडला मिळाला. या स्पर्धेत एकूण पंधरा संघ सहभागी झाले होते.

 

 

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने, यावर्षी या आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील व्हिजनरी परफॉरमिंग आर्ट्स या लोककला समूहाने धनगरी लोककला प्रकाराचे अप्रतिम सादरीकरण केले. या सादरीकरणात एकूण २४ कलाकारांनी भाग घेतला. कलाकारांच्या यशाबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी अभिनंदन केले आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेनंतर विजेत्या राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

डी.आर.शाळेत आनंद बाजार उत्साहात

Next Post

शेतकऱ्याचे दुचाकीच्या हॅण्डलला अडकविलेली ५० हजार लांबविले

Next Post
आमलाण येथे दोघांना मारहाण,  परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा

शेतकऱ्याचे दुचाकीच्या हॅण्डलला अडकविलेली ५० हजार लांबविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

नंदुरबार माळी पंच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

July 3, 2025
4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

4 जुलै रोजी राष्ट्रवादीचे खा. सुनिल तटकरे नंदुरबार दौऱ्यावर, जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांची माहिती

July 3, 2025
नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

नवापूरच्या रस्त्यांसाठी नागरिकांचं खड्ड्यात बसून ‘बेशरम’ आंदोलन

July 2, 2025
डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

डॉ.विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केले अभिनंदन

July 2, 2025
अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

अक्कलकुवा येथील गर्भवती महिलांना आहार कीटचे वाटप

July 2, 2025
नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group