नंदूरबार l प्रतिनिधी
लायन्स फेमीना क्लब महिलांसाठी नेहमीच आगळेवेगळे उपक्रम घेऊन सामाजीक बांधिलकी जोपासत असतात.यंदा मकरसंक्रांती निमित्त फेमिना क्लब ने शहरातील सर्व समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू आयोजित केले होते.या प्रसंगी आलेल्या प्रत्येक महिलेस कापडी पिशवीचे वाण देण्यात आले व बाजारात जाताना या पिशवीचा उपयोग करण्याचा आग्रह धरण्यात आला तसेच प्लास्टिक पिशव्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली.
कुटुंबामध्ये असा योग्य संदेश महिला प्रभावीपणे पोचवू शकतात म्हणून या उपक्रमाचे आयोजन क्लब तर्फे करण्यात आले होते.या अनोख्या उपक्रमात सुमारे –महिला सहभागी झाल्यात.या उपक्रमाचे यशस्वी आयोजन प्रोजेक्ट चेयरमन अध्यक्षा सौ.शीतल चौधरी, सचिव मीनल म्हसावदकर,ट्रेझरर सौ.अपर्णा पाटील,यांचेसह फेमिना क्लब सदस्यांनी केले.क्लब तर्फे मिळालेल्या अनोख्या वाणा बद्दल व पर्यावरण जपण्याच्या संदेशा बद्दल माहोल वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.