म्हसावद l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था आज कोअर बँकिंग अँपच्या निमित्ताने राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या श्रेणीत जावुन बसल्याचे मत पतसंस्थेचे संचालक रविंद्र बोरसे यांनी आपल्या प्रास्ताविकातून व्यक्त केले.
धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने कोअर बॅंकिंग प्रणालीचा अवलंबन करून सभासदांसाठी अँपची निर्मिती केली असुन, अँपच्या उद्घाटनाचे आयोजन पतसंस्थेचे चेअरमन शिवानंद बैसाणे यांच्या अध्यक्षेतेखाली पतसंस्थेच्या मुख्यालयात अॅप लाँचींग च्या सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लोकहिताय गटाचे गटनेता रविंद्र खैरनार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माझ्या नेतृत्वाखाली २०११ ला लोकहिताय गट निवडून आला व त्या वेळेस कर्ज मर्यादा १लाख ७५ हजार होती व व्याज दर १६%होता तरीही त्या वेळेस सत्तर टक्के कर्ज देण्या इतपत सुद्धा पैसा उपलब्ध संस्थेत उपलब्ध नव्हता. मुदतपूर्ण झालेल्या ठेविदारानां ठेवी परत करायला सुद्धा पैसे उपलब्ध नव्हते . तसेच संस्था अडिच कोटींच्या तोट्यात होती.अशा परिस्थितीत आम्ही कामकाजाला सुरुवात केली व हळूहळू संस्थेची परीस्थिती सुधारली व पुढे कर्ज मर्यादा सात लाख केली.चार वर्षात अडीच कोटी संचित तोटा भरुन काढला . गेल्या चार वर्षांपासून सभासदांना डिव्हिंड देण्यात येत आहे व वेळोवेळी कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी केले व आज पतसंस्थेने गरुड झेप घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र नांद्रे,संचालक शरद पाटील, संचालक पुकराज पाटील, सभासद भुपेश वाघ,बापु पारधी,धिरज परदेशी व सुधिर पाटील आदिनी संस्थेच्या भरभाराटी बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गटनेते, चेअरमन, व्हा .चेअरमन व संचालक मंडळाचे व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले .
शेवटी अध्यक्षिय भाषणात चेअरमन शिवानंद बैसाणे यांनी सांगितले की या मोबाईल अॅप मुळे सर्व सभासदांना आपल्या खात्यातील व्यवहार शाखेत न येता सभासदांना आपले व्यवहार घरी बसल्या पाहता येणार आहेत . धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बारा शाखा व मुख्यालय ऑनलाईन झाल्याचे सांगितले . मी ऑगस्ट २०२१पासुन चेअरमन पदांची धुरा सांभाळत असुन, माझ्या या दिड वर्षाच्या कार्यकाळात कर्ज मर्यादा 8 लाखावरुन १६ लाख केली, जामिनकी कर्जाचा व्याजदर अडिच टक्के कमी केला. (१२% वरुन ९:५०%केला),प्रासंगिक कर्ज २० हजारावरुन ५० हजार केले, उच्च शिक्षण कर्ज १ लाख नविन सुरू केले ,तसेच पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. या माझ्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांचे तीन वेळा पगार वाढविले.त्यांच्या पगारात पाच ते दहा हजारांनी वाढ केली .
पतसंस्था अतिशय बिकट परिस्थितीतून वाटचाल करुन आज अतिशय सशक्त व भरभराटीस आणली असुन, संस्थेला सतत चार वर्षापासून ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झालेला आहे. यात गटनेते रविंद्र खैरनार, व्हाईस चेअरमन अनिल सोनवणे सर्व संचालक, संस्थेचे जनरल मॅनेजर सह सर्व अधिकारी,कर्मचारी यांच्या प्रयत्नांनी हे शक्य झाल्याचे चेअरमन शिवानंद बैसाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
यावेळी ग.स.बॅकेचे चेअरमन प्रविण भदाणे, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अनिल सोनवणे, संचालक शरद पाटील, रविंद्र बोरसे, शिरीष कुवर,पुकराज पाटील,आनंद पाटील,मा़ंगिलाल गांगुर्डे, मनिषा साळुंखे, सुरेंद्र पिंपळे, मिलिंद चौधरी, जनरल मॅनेजर संजय भदाणे,डे.जनरल मॅनेजर किरण पाटील,समन्वय समितीचे अध्यक्ष राजेंद्र नांद्रे, ग.स.बॅकेचे संचालक चंद्रशेखर पाटील, संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र पाटील, जितेंद्र भामरे,राजेंद्र भामरे,भुपेश वाघ,चंद्रकांत सत्तेसा, नानासाहेब बोरसे, विश्वनाथ सोमवंशी,मनोहर शिंदे, प्रविण गवळे, मुरलीधर शिंदे,विजय पाटील , ज्ञानेश्वर बाविस्कर,संजय साळुंखे, किशोर पाटील,रविंद्र पवार, श्याम भिवसणे, रामभाऊ पाटील,किरण पाटील,राका पाटील, देविदास नागमल, नितीन जाधव,माधव भामरे पतसंस्थेचे मॅनेजर अनिल पाटील, नरेंद्र सोनवणे, महेंद्र शिंदे,विजय शिंदे, लेखापाल अमोल पाटील, शाखाधिकारी व संस्थेचे कर्मचारी वआदी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्व उपस्थितांचे आभार संचालक रविंद्र बोरसे मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








