नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील आंबेडकर चौकात तोंडाला रुमाल बांधून आंबेडकर नगर प्रवेशद्वाराजवळ तलवार व लाकडी दांडके घेऊन दगड व विटांचा मारा करुन वाहनांसह इलेक्ट्रिक पोलच्या दिव्यांचे नुकसान केल्याप्रकरणी २१ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील आंबेडकर नगर येथे परेश रविंद्र चौधरी, पंकज चौधरी, मनिष सुरेश चौधरी, सनी चौधरी, विकी उर्फ बालाजी चौधरी, प्रशांत चौधरी, मयूर उर्फ मारी मधुकर चौधरी, विराज दीपक चौधरी, योगेश उर्फ मोंटू चौधरी, भैय्या भोई, रोहित उर्फ पॉवर चौधरी, जितू जवेरी, प्रफुल्ल उर्फ बैजू चौधरी, राकेश चौधरी, हितेश सुधाकर चौधरी, स्वामी उर्फ वैभव चौधरी, भुषण गणपत चौधरी, जयदिप चौधरी व इतर तीन इसमांनी तोंडाला रुमाल बांधून स्वत:ची ओळख लपवत हातात लाकडी दांडके व तलवार घेवून
आंबेडकर नगर प्रवेशद्वाराच्या दिशेने दगड व विटांचा मारा केला. सदर दगड व विटांच्या माऱ्यात राकेश रामु पेंढारकर, सलीम बादशहा पिंजारी, अरबाज ईस्माईल काकर, दीपक सुकलाल निकम, खलील शफिक खाटीक, सागर सुरेश चौधरी यांच्या वाहनांचे नुकसान झाले.
तसेच महावितरणच्या मालकीच्या इलेक्ट्रिक पोलवरील दिव्यांचे नुकसान झाले. याबाबत पोना.संजय सायमल मालसुरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात २१ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ४२७, ३३६ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ४/२५ सह सार्वजनिक संपत्ती हाती प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ७ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर करीत आहेत.








