Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुन्हा उडाली खळबळ : गुन्हा दाखल होवू न देण्याच्या मोबदल्यात आठ हजाराची लाच स्वीकारनाऱ्या पोलिस शिपाईस रंगेहाथ अटक

team by team
January 18, 2023
in क्राईम
0
अरे बापरे: सोळाशे रूपयांची लाच स्विकारतांना मुख्याध्यापकाला रंगेहात अटक
नंदुरबार  l प्रतिनिधी
विसरवाडी पोलिस ठाण्यातील  मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल होवू न देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून आठ हजार रुपये स्विकारल्याप्रकरणी पोलिस शिपाई दारासिंग पावरा यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले आहे.
तक्रारदार व इतर यांच्यात झालेल्या मारहाण व वादाच्या प्रकरणात गुन्हा दाखल न होवू देण्याच्या मोबदल्यात नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपाई दारासिंग जोरदार पावरा याने १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती आठ हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराने याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली होती. त्यानुसार काल ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून पोलिस ठाणे आवारात पोलिस शिपाई दारासिंग पावरा हा आठ हजार रुपयांची लाच स्विकारत असतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पंच साक्षीदारांसमक्ष रंगेहात पकडले. सदरची कारवाई एसीबीचे पोलिस उपअधिक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोहेकॉ.विलास पाटील, पोना.अमोल मराठे, मपोना. ज्योती पाटील, पोना. मनोज अहिरे यांच्या पथकाने केली आहे.
सलग दुसऱ्या दिवशी नवापूर तालुक्यात लाच स्विकारल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. दि.१७ रोजी सुळी येथील मुख्याध्यापकाने शाळेच्या दाखल्यात आईचे चुकीचे असलेले नावात दुरुस्त करुन देण्यासाठी सोळाशे रुपयांची लाच स्विकारल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर काल पोलिस शिपायाने आठ  हजाराची लाच स्विकारल्याने विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2023: मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त 10 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य

Next Post

नंदूरबार येथे रोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय कामबंद आंदोलन,तहसील पंचायत समिती रोहयोची कामे ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add