नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बस स्थानक शेजारील वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या स्मारक आवारात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला शहरातील युवकांकडून श्रमदान करून परिसरातील काटेरी झुडपे व घाण स्वच्छ करण्यात आली.

दरवर्षी पुण्यतिथी निमित्त महाराणा प्रतापसिंग यांच्या स्मारकाला शहरातील नागरिकांमार्फत अभिवादन करण्यात येते.नंदुरबार शहरातील भव्य अश्वारूढ वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंग यांच्या स्मारकाशेजारी पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला सामाजिक आपुलकी म्हणून व महापुरुषांच्या कार्याला उजाळा देत नंदुरबार शहरातील युवकांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान केले,

दरवर्षी अशाच प्रकारे महापुरुषांच्या पुण्यतिथी व जयंतीच्या पूर्वसंध्येला श्रमदान करण्याचा निश्चय संबंधित युवकांमार्फत घेण्यात आला आहे. तसेच यापुढील श्रमदानात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले
यावेळेस नंदुरबार शहरातील दिग्विजयसिंग राजपूत, भूषण राजपूत, विवेक पाटील, राहुल गिरासे व डॉ वरून गिरासे उपस्थित होते.








