शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने कला महोत्सव ‘आर्टिफेस्ट 2023 चे’ दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या विविध विद्याशाखेतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह परिसरातील विविध शाळा महाविद्यालयातील कलाप्रेमींसाठी दरवर्षी कला महोत्सव अर्थात आर्टिफेस्टचे आयोजन केले जाते. यावर्षीचा आर्टिफेस्ट दि .9 फेब्रुवारी 2023 गुरुवार रोजी मंडळाच्या डी.एन.पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार पटेल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कला महोत्सवात चित्रकला, स्केचेस, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, डिझाईन, टॅटू तसेच इतर सर्व कला प्रकारांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे.
मंडळाच्या विविध ज्ञान शाखांसह परिसरातील सातवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी, महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या कलांचे प्रदर्शन मांडू शकतात, सदर कला प्रदर्शनासाठी संयोजक प्रा. दिलीप सूर्यवंशी (मोबाईल नंबर 94 22 26 24 93) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.आर्टिफेस्ट अर्थात कला महोत्सव मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असल्याची माहिती प्रा.सूर्यवंशी यांनी दिली आहे.








