Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे बापरे: सोळाशे रूपयांची लाच स्विकारतांना मुख्याध्यापकाला रंगेहात अटक

team by team
January 17, 2023
in क्राईम
0
अरे बापरे: सोळाशे रूपयांची लाच स्विकारतांना मुख्याध्यापकाला रंगेहात अटक

नंदुरबार | प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील सुळी येथे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या आईचे चुकीचे नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व इयत्ता दहावीचे मार्कशीटसाठी १ हजार ६०० रूपयांची लाच घेतांना येथील माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकाला रंगे होत अटक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि,तक्रारदार यांनी सन २०१७-२०१८ यावर्षी माध्यमिक विद्यालय सुळी, ता.नवापूर येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेतले आहे. तक्रारदार हे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेण्यासाठी माध्यमिक विद्यालय, सुळी ता.नवापूर येथे गेले असता मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर रा. – साईनगरी ,्मेन रोड, नवापूर.यांनी तक्रारदाराकडून दि.१४ जानेवारी २०२३ रोजी पाच हजार रुपये घेऊन तक्रारदार यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला. तक्रारदार यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नाव चुकीचे असल्याने , चुकीचे नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व त्यांचे इयत्ता दहावीचे मार्कशीट देण्यासाठी तक्रारदार यांनी मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर यांना पुन्हा विनंती केली.

यावेळी आलोसे मुख्याध्यापक यांनी तक्रारदाराकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त करून देणे व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कलिस्ट आणून देण्याच्या मोबदल्यात २ हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर आज दि.१७ जानेवारी २०२३ रोजी तक्रारदाराकडून १ हजार ६०० रूपये लाच स्वीकारतांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत नवापूर पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र नरेंद्र पवार यांच्या मागदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधीक्षक ला प्र वि नंदुरबार राकेश चौधरी, पो.नि. समाधान एम.वाघ. पोहवा विजय ठाकरे, पोहवा अमोल मराठे, पोना देवराम गावित यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा
Previous Post

के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयात पारितोषिक वितरण 

Next Post

नवापूर शहरात नगर पालिकेने १७० दुकानांचे अतिक्रमण काढले, अनेक ठिकाणी झाली शाब्दिक चकमक

Next Post
नवापूर शहरात नगर पालिकेने १७० दुकानांचे अतिक्रमण काढले, अनेक ठिकाणी झाली शाब्दिक चकमक

नवापूर शहरात नगर पालिकेने १७० दुकानांचे अतिक्रमण काढले, अनेक ठिकाणी झाली शाब्दिक चकमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add