Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथमच नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व

‘ओसामा’ नाटकाच्या माध्यमातून बालकलावंतांचे सादरीकरण

team by team
January 15, 2023
in राज्य
0
शासनाच्या बालनाट्य स्पर्धेत प्रथमच नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व

नंदूरबार l प्रतिनिधी

 

दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धेत प्रथमच नंदुरबार जिल्ह्यातील ‘ओसामा’ या बालनाट्याच्या माध्यमातून या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधीत्त्व करण्यात आले.

 

दि.१० ते १३ जानेवारी २०२३ दरम्यान १९ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचे छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, जळगांव येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातून प्रथमच गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ शिंदे, ता.जि.नंदुरबार निर्मित ‘ओसामा’ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सदर बालनाट्याचे लेखन आसेफ शेख (अन्सारी) यांनी केले आहे. दिग्दर्शन-राजेश जाधव, नेपथ्य-नागसेन पेंढारकर, प्रकाशयोजना-मनोज सोनार, संगीत-जितेंद्र खवळे, रंगभूषा-तुषार सांगोरे, पार्थ जाधव, वेशभूषा-चिदानंद तांबोळी, रोहित हराळे यांनी केले होते.

 

 

या बालनाट्यात निलराज पटेल, उत्कर्षा भारती, तनिष्का पेंढारकर, दिया सुर्यवंशी, श्रेयस वाघमारे, प्राप्ती तांबोळी, लोकेश पाटील, उदय हराळे, शशांक जाधव, स्मित पटेल, प्रित तांबोळी, आयुष पाटील, प्रियांशु मच्छले, दुर्गेश हराळे या बालकलावंतांनी आपला नाट्याविष्कार सादर करुन नाट्य रसिकांची दाद मिळविली. गेल्या अनेक वर्षांपासून गागडेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले येत होते. त्याच प्रशिक्षण शिबिरातील बालकलावंतांनी या बालनाट्यात सहभाग घेतला होता. नंदुरबार जिल्ह्यातून प्रथमच या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत या बालनाट्याच्या माध्यमातून प्रतिनिधीत्व करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

व्हॉट्स ॲप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-११२ मध्ये समावेश

Next Post

धुळीपाडा ते सोनखडका  रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने अवैध वाहनासह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल केला जप्त

Next Post
धुळीपाडा ते सोनखडका  रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने अवैध वाहनासह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल केला जप्त

धुळीपाडा ते सोनखडका  रस्त्यावर वनविभागाच्या पथकाने अवैध वाहनासह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add