Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

२१ व २२ जानेवारी रोजी होणार हस्ती-जिभाऊ करंडक

team by team
January 10, 2023
in राज्य
0
२१ व २२ जानेवारी रोजी होणार हस्ती-जिभाऊ करंडक

नंदुरबार |  प्रतिनिधी

 

नंदुरबार  येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या आयोजनाबाबतची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे सदस्य तथा नाट्यकर्मी मनोज सोनार हे होते. यंदा सदर स्पर्धा हस्ती-जिभाऊ करंडक या नावाने दि.२१ व २२ जानेवारी रोजी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात संपन्न होणार आहे. असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

 

 

 

गेल्या अकरा वर्षापासून जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे सातत्यपूर्ण आयोजन होत आहे. सदर आयोजन गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्या तर्फे राज्यपुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ करण्यात येते. या स्पर्धेत राज्यभरातील नाट्यसंस्था व महाविद्यालये सहभागी होऊन आपला नाट्याविष्कार सादर करीत असतात. या वर्षी मात्र सदर स्पर्धेचे प्रायोजकत्व दि हस्ती को-ऑप बँक लिमिटेड हे करीत असून सहप्रायोजकत्व रोटरी क्लब ऑफ नंदनगरी करणार आहेत. म्हणून यंदा सदर स्पर्धा हस्ती-जिभाऊ करंडक या नावाने दि.२१ व २२ जानेवारी रोजी नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे, असे या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले.

 

 

 

 

यावेळी नाट्यकर्मी नागसेन पेंढारकर व राजेश जाधव यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत आपले विचार मांडले. जिभाऊ करंडकमुळे नंदुरबार जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने उभी राहिली असून या स्पर्धेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील कलावंतांना व रसिकांना विविध नाट्य अविष्कार अनुभवयास मिळत असतात असे मत मनोज सोनार यांनी व्यक्त केले. बैठकीत जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.)चे जिल्हाध्यक्ष एन.टी.पाटील यांनी जिभाऊ करंडकच्या नियोजनाबाबत आपले मत व्यक्त करीत जिभाऊ करंडक यशस्वी होण्याबाबतचा विश्वास व्यक्त केला. यावेळी नाट्यकर्मी रविंद्र कुलकर्णी, क्षमा वसईकर, जितेंद्र खवळे, तुषार सांगोरे यांनी देखील आपले मत व्यक्त केले.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करण्यात येतील, असेही बैठकीत सांगण्यात आले. यावेळी आयोजक आशिष खैरनार यांच्यासोबत कुणाल वसईकर, विनोद ब्राह्मणे, रत्नदीप पवार, नंदुरबार जिल्हा अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाचे सचिव एस.एन.पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोद्यात रक्त साठवणूक केंद्र सुरू करण्याची मागणी, एक महिन्यात रक्त साठवणूक केंद्र कार्यान्वित करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आश्वासन

Next Post

नवापूरजवळ ट्रकची ट्रॉलाला धडक, चालकाविरोधात गुन्हा 

Next Post
नवापूरजवळ ट्रकची ट्रॉलाला धडक, चालकाविरोधात गुन्हा 

नवापूरजवळ ट्रकची ट्रॉलाला धडक, चालकाविरोधात गुन्हा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add