तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहर हिंदुराष्ट्र सेनेतर्फे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वरील वक्तव्याचा निषेधार्थ स्मारक चौकात अजित पवार यांच्या पूतळ्याचे दहन करण्यात येणार होते.पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पूतळ्याला काळे फासून निषेधाच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी नुकतेच नागपुर हिवाळी अधिवेशन येथे धर्मवीर श्री.संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणु नये .असे वक्तव्य केले त्याविरोधात हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या आदेशानुसार हिंदुराष्ट्र सेना तळोदा तालुक्याच्या वतीने या वक्तव्याचा निषेध करून अजीत पवार यांचा पुतळ्याला काळे फासण्यात आले.असं वक्तव्य करणारी राष्ट्रवादी हि राष्ट्रवादी नसुन धर्मविरोधी व देशविरोधी पार्टी आहे व हे कायम असं बेताल वक्तव्य करत आले आहेत.
अश्या नेत्यांना यापुढे त्यांची जागा दाखवण्यात येईल.व हिंदुराष्ट्र सेने तर्फे सडेतोड उत्तर देण्यात येईल.यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन जोहरी, जिल्हाउपाध्यक्ष पारस परदेशी, जिल्हासचिव राहुल जैन,तालुकाध्यक्ष किरण ठाकरे,शहराध्यक्ष योगेश चव्हाण, रोहित सूर्यवंशी, कार्तिक शिंदे,दीपक चौधरी ,जितेंद्र चित्ते,गणेश चौधरी, प्रसाद पाठक, रोहन चौधरी, नंदराज रजपूत, जिग्नेश मराठे,यशवंत राजपूत, पवन भोई,हर्षल बोरसे,सनी बोरसे,गौतम राठोड,हर्ष वाणी,कृष्णा सोनार,सुनील शिंदे,नरु पाडवी आदी उपस्थित होते.








