नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा समारोप झाला असुन लोकगीत या प्रकारात लातुर विभागाने गोंधळ गीत सादर करत प्रथम क्रमांक तर लोकनृत्य या लातुर विभागाने दिंडी नृत्य सादर करत प्रथम क्रमांक मिळविला आहे.

क्रीडा व युवक सेवा सचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , नंदुरबारव्दारा राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन ६ व ७ जानेवारी २०२३ रोजी छत्रपति शिवाजी महाराज नाट्य मंदीर, नंदुरबार करण्यात आलेले होते. सदर युवा महोत्सव नंदुरबार येथे प्रथमच करण्यात आले होते. या राज्यस्तरीय युवा महोत्सवात महाराष्ट्रातून नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद अश्या ८ विभागातून लोकनृत्य व लोकगीत या कला प्रकाराकरीता एकुण २५० कलाकारांनी सहभाग घेतला. या युवा महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिक्षक सचिन हिरे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शहर पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर , नेहरू युवा केंद्राचे सम्वयक अर्श कौशिक, क्रीडा संघटक प्रा. डॉ. ईश्वर धामणे, श्रॉफ हायस्कूलचे मुख्याध्यापिका सुषमा शाह, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिवाजी पाटील, डी. आर .हायस्कूल चे मुख्याध्यापक, नारायण भदाणे, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापिका, सीमा मोडक , एस. ए. मिशन हायस्कूलचे मुख्याध्यापिका नुतनवर्षा वळवी , पी.के.पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेंद्र पाटील, सोनिया पाडवी, तालुका क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, व अरविंद चौधरी, उपस्थित होते.
या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नटराज मुर्तीचे पुजन करुन दिप प्रज्वलन करण्यात आले व मान्यवरांनी आपले मनोगत केले. योवळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी आपले प्रास्तावीक भाषणात अत्यंत कमी कालावधीत या युवा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करण्याचा प्रयत्न केले असल्याचे सांगितले. सदर युवा महोत्सवाचे लोकनृत्य व लोकगीत या कला प्रकारचे महेश कवडे, योगेश सोनावणे, सागर रोकडे, श्रीमती सुनीता चव्हाण, हेमंत पाटील, यांनी परिक्षक म्हणुन महत्वाची भूमिका बजावली तसेच या राज्यस्तरीय युवा महोत्सवात लोकगीत या प्रकारात लातुर विभागाने गोंधळ गीत सादर करत प्रथम क्रमांक मिळविला, तसेच मुंबई विभागाचे कोळीगीत सादर करत व्दितीय क्रमांक तर नागपूर विभागाने छत्तीसगढी कर्मा गित सादर केले व तृतीय क्रमांक मिळविला. तसेच लोकनृत्य या लातुर विभागाने दिंडी नृत्य सादर करत प्रथम क्रमांक मिळविला.मुंबई विभागाने देखिल दिंडी नृत्य सादर करत व्दितीय क्रमांक तर नाशिक विभागाने ढोल कुणीता नृत्य सादर करुन तृतीय क्रमांक मिळविला. या राज्यस्तर युवा महोत्सवातील प्रथम क्रमांकांचे स्पर्धक हे हुबळी, कर्नाटक येथे दि.१२ ते १७ जानेवारी २०२३ होणार्या राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतील.
सदर युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजनची जिल्हा क्रिडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, मिलिंद वेरुळकर श्रीराम मोडक, निलेश गावीत, पंकज पाठक, मिनल वळवी, चंद्रशेखर चौधरी, जितेंद्र माळी, आशिष कडोसे मुकेश बारी, महेंद्र काटे, कविता राठोड, कल्पेश बोरसे, राजेश्वर चौधरी,मनिष सनेर, योगेश माळी, अमोल चित्ते, प्रदिप माळी, गनराज कुवर, भुषण माळी, निलेश खलाणे, अजय खैराळे, जयदीप राजपुत यांनी परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाचे आभार डॉ.मयूर ठाकरे यांनी केले तर प्रास्ताविक गणेश पाटील व जितेंद्र पगारे यांनी केले.








