नंदूरबार l प्रतिनिधी
दिल्ली येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय परियोजन संचलित ब्लॉक पंचायत विकास योजना आणि जिल्हा पंचायत विकास योजना अंतर्गत सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळा नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी देखील भाग घेत या कार्यशाळेत गावित यांनी जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद केंद्र सरकारच्या अमृत आहार योजना प्रभावीपणे राबवत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातून स्थलांतर होणाऱ्या कुटुंबांची माहिती घेऊन ज्या ठिकाणी स्थलांतर झालेले आहेत,
तिथल्या जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तिथं लहान बालकांना पोषण हार पुरवला जात असून कुपोषणाच्या प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत उपाय योजना राबवली जात आहे. नंदुरबार जिल्हा कुपोषणाच्या नावाने ओळखला जातो, मात्र आता कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रयत्न करत असून लवकरच जिल्ह्यातील कुपोषण हद्दपार करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या कार्यशाळेत सांगितल.

त्यासोबत बचत गटांना प्रोत्साहन देत असून त्यांना लागणाऱ्या गोष्टी देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत पुरवल्या जात आहेत. मात्र जिल्हा परिषदेमार्फत अनोखा असा जिल्हा परिषद आपल्या दारी हा उपक्रम राबवला जात आहे नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात जाऊन तिथल्या नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन तात्काळ त्याच्या निवारा केला जात असल्याने नागरिकांना मोठा दिलासा जिल्हा परिषदेमार्फत मिळत आहे. या सर्व गोष्टी दिल्ली येथे कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी मांडल्यानंतर केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाकडून आणि राज्यातून आलेले जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या कौतुक करण्यात आलेला असून या गोष्टी आपापल्या जिल्ह्यात देखील राबवणार असून दुपार प्रमाणेच इतर जिल्ह्यातून होणारा स्थलांतर आणि कुपोषणासाठी डॉक्टर सुप्रिया गावित यांनी केलेल्या उपाययोजना राबवल्या जातील अशा भावना इतर जिल्ह्यातील अध्यक्षांनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आहेत.








