नंदुरबार l
सुमारे ४० वर्षापासून अखंडपणे सुरू असलेली निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा आज तालुक्यातील होळ गावात पोहचली. होळ गावात शेतकी संघाचे चेअरमन बी.के.पाटील यांनी यात्रेचे स्वागत केले.
दिंंडीत कीर्तनकार श्याम महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसाद घेऊन दुपारी पुढील गावासाठी होळ मार्गे निंबेल-कंढ्रे-कारली-शनिमांडळ पासूून जायखेडा-त्र्यंबकेश्वरपर्यंत ही निवृत्ती महाराजांची दिंडी १८ जानेवारीला एकादशीपर्यंत त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहे.








