नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील समशेरपुर येथील आयान मल्टीट्रेड एल. एल.पी. कारखान्याच्या चालु गळीत हंगाम २०२२-२३ च्या संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक उस वजन काट्याची तपासणी मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक व वैधमापक शास्त्र विभागाने नुकतीच तपासणी केली. या तपासणी वेळी आयान कारखान्यावर ऊस गाळपासाठी घेऊन आलेल्या ट्रॅक्टर व ट्रकचे वजन अत्याधुनिक संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक उस वजन काट्यावर करण्यात आले. यावेळी आयान कारखान्याचे सर्व उस वजन काटे अचूक आले.
सदर पथकात तहसिलदार, नंदुरबार भाउसाहेब थोरात, पोलिस निरीक्षक, नंदुरबार राहुल पवार, साखर आयुक्त महा.राज्य यांचे प्रतिनिधी जी. ए. देवरे, वैधमाप शास्त्र विभागाचे निरीक्षक प्रशांत खडाख, शेतकरी संघटना प्रतिनिधी नथ्थु पाटील व पवन पाटील, हंबीरराच चव्हाण तसेच कारखाना अधिकारी उपस्थित होते. यावेळी पथकाने आयान साखर कारखान्याकडील उपलब्ध असलेल्या सर्व संगणकीकृत इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यांची तपासणी केली. प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वजनकाटयाच्या बाहेरील बाजूस व उस उत्पादक व वाहनधारकास दिसण्यासाठी जम्बो डिस्प्ले बसवण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. वजन तपासणी पुर्वी उसाणे भरलेल्या गाडयांचे वजन करुण गव्हाणीकडे गेलेल्या गाडया पथकातील प्रतिनिधींकडून परत इलेक्ट्रॉनिक वजन काटयावर फेरवजन करण्यासाठी बोलावण्यात आल्या व त्या वाहनांचे फेर वजन करुन निरीक्षण नोंदवण्यात आले.
या पथकाने विविध निकषाच्या आधारे वजन काटयाची तपासणी केली. कारखान्यातील ऊस वजन काटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र या पदकाकडून कारखान्यास देण्यात आले. त्यामुळे कारखान्यातील ऊस वजन काटयाच्या विश्वासहर्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.








