म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील व्हि.जे.एन.टी आश्रम शाळा म्हसावद विद्यालयात क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रातील १३ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन सद्गुरु विद्या प्रसारक मंडळाचे चेअरमन सुभाषभाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी एस. एफ. ठाकरे, पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक गुलाबसिंग पावरा, ग्रामविकास अधिकारी बी.पी.गिरासे, सरपंच तलावडी हिम्मत पावरा, लेखा सहाय्यक प्रल्हाद सामुद्रे, विषय तज्ञ मिलिंद देसले, पिरॅमल फाउंडेशनचे रमेश जायनारकर, केंद्रप्रमुख पराग चव्हाण, पदोन्नती मुख्याध्यापक भिला निळे, मंगा कापुरे हे उपस्थित होते.
तर पंच म्हणून युवराज पाटील, सुधीर चौधरी, अंकुश पावरा, भरत काकुळते, विशाल मोरे आणि गुणलेखक म्हणून धरमदास पाटील, मुकूंद पाटील, जितेंद्र निकुंभ,करण पावरा, विनोद पढ्यार, गणेश भिलावे, इरेशा आजुरे, व्हि.जे.एन.टी. आश्रम शाळा म्हसावद, माध्यमिक शाळा अनकवाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. स्पर्धेत कबड्डी, खो-खो तसेच वैयक्तिक खेळात गोणपाट, धावणे, लिंबू चमचा या स्पर्धा घेण्यात आल्या. कबड्डी संघात प्रथम क्रमांक जि. प. शाळा जुनवणे येथील छत्रपती संभाजी गट विजयी झाला. तर द्वितीय क्रमांक जि. प. शाळा पिंप्री येथील छत्रपती शिवाजी गट संघ विजयी झाला. तसेच खो – खो संघात प्रथम क्रमांक जि. प. शाळा तलावडी येथील याहा मोगी माता संघ विजयी झाला. तर द्वितीय क्रमांक जि. प. शाळा टवळाई येथील सावित्रीबाई फुले संघ विजयी झाला. सांघिक व वैयक्तिक स्पर्धेत यशस्वी खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. प्रास्ताविक रविंद्र बैसाणे, सूत्रसंचालन मनिषा धनगर तर आभार मनिषा कुंदे यांनी मानले.