Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुष्पा झाला गजाआड : मध्य प्रदेश राज्यातून चंदनाचे तेल व लाकुड सह २९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत, तिघांना अटक,जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई

team by team
January 4, 2023
in क्राईम
0
पुष्पा झाला गजाआड : मध्य प्रदेश राज्यातून चंदनाचे तेल व लाकुड सह २९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत, तिघांना अटक,जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने धडक कारवाई करीत मध्य प्रदेश राज्यातून 15 लाख 72 हजार रुपये किमतीचे चंदनाचे तेल व लाकुड सह एकुण 28 लाख 56 हजार रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला असून याप्रकरणी तिघांना अटक  करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 5 डिसेंबर रोजी रात्री 1.15 वा. सुमारास नवापुर तालुक्यातील नवरंग गेट जवळ कोठडा शिवारातील MIDC कडे जाणारे रस्त्यावर हैदर उर्फ इस्त्राईल इस्माईल पठाण  रा. कुंजखेडा ता. कन्नड जि. औरंगाबाद, इरफान इब्राहिम पठाण, युसुफ असिफ पठाण, गौसखॉ हानिफखाँ पठाण सर्व रा ब्राम्हणी गराडा ता कन्नड जि. औरंगाबाद, अकिलखॉ ईस्माईलखॉ पठाण रा- कठोरा बाजार ता.भोकरदन जि.जालना हे भागात दरोडा टाकण्याच्या पूर्व तयारीत असतांना एक महिंद्रा कंपनीची ग्रे रंगाची स्कार्पिओ मोटार गाडी ( MH 13 N 7626)  वाहनासह मिळून आले म्हणुन त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द् नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि क 399, 402 प्रमाणे गुन्हा दाखल करुन सकाळी 6.45 वा. अटक करण्यात आली होती.
परंतु दि. 5 डिसेंबर 2022 रोजी 9.05 वा. सुमारास वर नमुद पाचही आरोपीतांनी नवापूर पोलीस ठाण्याचे लॉकअपची मागील खिडकी तोडून त्याद्वारे पलायन केले होते. म्हणून नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि क 224 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखा व नवापूर गु.र.नं. पोलीसांच्या पथकाने फरार झालेले सर्व पाच आरोपीतांना मध्य प्रदेश व औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.
ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी गौसखा हानिफखॉ पठाण हा सराईत असल्याने त्यास अधिक विचारपूस केली असता त्याने सुमारे सप्टेंबर- 2022 मध्ये नवापूर येथे त्याच्या वरील साथीदारांच्या मदतीने चंदनाचे झाड कापून तसेच महाराष्ट्र व इतर राज्यात चंदनाचे झाड कापून ते इतर साथीदारांचे मदतीने अब्दुल रेहमान कादर रा. गवाडी ता.जि. सेंधवा मध्य प्रदेश यांना विक्री केल्याचे सांगितले. नवापूर येथील चंदन चोरीबाबत नवापूर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात 20 हजार रु. कि.चे एक चंदनाचे हिरवे झाड कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात रवाना केले. पथकाने मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा गवाडी गावात जावून अब्दुल रेहमान कादर याची माहिती घेतली असता, अब्दुल कादर याचे एस.बी. अरोमॅट्रीक्स नावाची फक्टरी असल्याचे समजून आले. पथकाने स्थानिक पोलीसांच्या मदतीने अब्दुल रेहमान कादर याच्या मालकीचे एस.बी. अरोमॅट्रीक्स फॅक्टरीमध्ये गेले असता तेथून अब्दुल रहेमान अब्दुल कादर मुळ रा. कुन्नीकलम हाऊस, आलेम्मपाडे ता. मुथवडे जि. कासारगड, केरळ ह.मु. एस. बी. अरोमॅक्ट्रीक्स फॅक्टरी, गवाडी ता. निवाणी जि. बडवाणी म.प्र., सौदागर सहदेव कोलते, उमेश विलास सुर्यवंशी दोन्ही रा. नारी ता. बारशी जि. सोलापूर यांना अटक करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेला अब्दुल रहेमान कादर यास गौसखाँ पठाण याची ओळख देवून त्याने दिलेल्या चंदनाच्या झाडाचे लाकुडबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. म्हणून पथकाने संपूर्ण फॅक्टरीची पाहणी केली असता एक टाटा कंपनीच्या YODHA गाडीमध्ये खालच्या बाजूने दोन तीन फुटाचे लांब खाच व त्यामध्ये 5, लाख 84,000 रु. किं.चे 292 किलो चंदनाचे लाकडाचे तुकडे मिळून आले, म्हणून पथकाने फॅक्टरीची बारकाईने पाहणी केली असता तेथे 17 लाख 72 हजार रुपये किमतीचे 26.02 किलो ग्रॅम वजनाचे चंदनाचे सुगंधी तेल व चंदनाचे लाकुड वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे 7 लाख रु. किं.चे एक टाटा कंपनीचे YODHA वाहन (क्र. MH-46 BF-0543) असा एकुण 28 लाख 56 हजार रु. किं.चा मुद्देमाल हस्तगत करुन तिन्ही आरोपीतांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
ताब्यात घेण्यात आलेला अब्दुल कादर यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यास गौसखाँ पठाण याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातून चंदनाचे झाडाचे तुकडे चोरी करुन आणल्याचे सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश राज्यातील आणखी काही चंदन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदर गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असून गुन्ह्याच्या मुळापर्यंत जावून गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांना लवकरच ताब्यात घेवून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश राज्यातील चंदन चोरीचे बरेचसे गुन्हे उघडकीय येण्याची शक्यता असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक  निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर, नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उप निरीक्षक अशोक मोकळ, पोलीस हवालदार दिनेश वसुले, पोलीस नाईक योगेश थोरात, विनोद पराडके, हेमंत सैंदाणे, पोलीस अंमलदार गणेश बच्छे, परमानंद काळे, दिनेश बाविस्कर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव पोलीस अंमलदार अभय राजपुत यांच्या पथकाने केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

बापरे: बापाने आपल्या चार महिन्याच्या मुलीचा गळा दाबत जमीनीवर आपटून केला खून

Next Post

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत दिलासादायक निर्णय घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add