Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीमती ही. गो. श्रॉफ हायस्कूल येथे प्लॅनेट कोड कार्यशाळा उत्साहात

team by team
January 4, 2023
in शैक्षणिक
0
श्रीमती ही. गो. श्रॉफ हायस्कूल येथे प्लॅनेट कोड कार्यशाळा उत्साहात
नंदुरबार l प्रतिनिधी
सार्वजनिक शिक्षण समिती संचालित श्रीमती ही. गो. श्रॉफ हायस्कूल मधील अटल टिंकरिंग लॅब येथे दिनांक २८ डिसेंबर २०२२ ते ०३ जानेवारी २०२३ या कालावधीत इयत्ता सहावी ते दहावी साठी प्लॅनेट कोड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यशाळा नीती आयोग, अटल इनोवेशन मिशन, डेल टेक्नॉलॉजी व लर्निंग लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये इयत्ता सहावी ते दहावी च्या एकूण १७७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये लर्निंग लिंक फाउंडेशनच्या मार्गदर्शक कोमल राऊत यांनी विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधत प्लॅनेट कोड या प्लॅटफॉर्मचे मार्गदर्शन केले व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध कोर्सेस ची माहिती दिली.
कार्यशाळेत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना डान्सिंग विथ ए. आय. या सॉफ्टवेअरची माहिती देण्यात आली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना वेब डिझाईनिंग कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना वर्चुअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी व मोबाईल ॲप डेव्हलपमेंट कसे करावे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना टिंकर कॅड या सॉफ्टवेअरच्या मदतीने विविध सर्किट कसे निर्माण करावेत याबद्दल माहिती देण्यात आली.
कार्यशाळेत शिकविलेल्या ज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी प्लॅनेट कोड प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रमाणपत्र देखील मिळविले.
सदर कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, पर्यवेक्षक जगदीश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे संयोजन अटल टिंकेरींग लॅब प्रमुख राजेंद्र मराठे यांनी केले. कार्यशाळेस  मृणाल देवकर,  महेश पाटील यांनी सहकार्य केले.
बातमी शेअर करा
Previous Post

निलेश पाटीलची राष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

Next Post

नवापूर येथे भाजपातर्फे भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या प्रतीकात्मक बॅनरला जोडे मारुन निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add