शहादा l
तालुक्यातील तिर्थक्षेत्र प्रकाशा येथील अमरधाममध्ये ओमशांती मंत्र फलक तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
नंदुरबार येथील कै.ग.भा.कमलाबाई बाबुराव सोनार व कै.कुमारी करुणाबाई बाबुराव सोनार यांच्या स्मरणार्थ तिर्थक्षेत्र प्रकाशा येथील अमरधाम येथे माजी जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील यांच्या हस्ते ओमशांती फलकाचे अनावरण झाले. तसेच प्रकाशाचे सरपंच रामनंदीनी भिल यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. नंदुरबार सुवर्णकार समाजाने १०० वृक्ष लावून संगोपन करण्याचे जाहीर केले. यावेळी शंकर सोनार, अरुण सोनार, महेश सोनार, हेमंत सोनार, अरुणशेठ, बारकू शिरोळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय सोनार यांनी केले.








