नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना 1 जानेवारी,2023 ते 31 डिसेंबर,2023 या कालावधीत मोफत अन्न धान्यांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
या योजनेतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थींना रास्त भाव दुकानातून देय असलेले अन्न धान्य गहू, तांदूळ व भरडधान्य मोफत उपलब्ध असेल व अंत्योदय शिधापत्रिकेवर साखर प्रति कार्ड 1 किलो 20 रुपये प्रती किलो दराने वितरीत करण्यात येईल. याची सर्व पात्र लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी केले आहे.








