नंदुरबार l प्रतिनिधी
देशात शेतकर्यांची परिस्थिती नाजूक असून शेतकर्यांना पीक कर्जाच्या माध्यमातून आधार देण्याची गरज आहे. त्यामुळे मी जिल्ह्यात विविध ठिकाणी पीक कर्ज व इतर कर्ज मेळावे घेत आहे. शेतकरी व इतर व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खा.डॉ. हिना गावीत यांनी केले.
तळोदा तालुक्यातील बोरद येथील ग्रामपंचायत कार्यालयात परिसरातील शेतकर्यांसाठी पीक कर्ज मेळावा घेण्यात आला यावेळी जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावीत बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आ. डॉ.विजयकुमार गावित, डॉ.कांतीलाल टाटिया,सुप्रीया गावीत, जि. प सदस्य पार्वतीबाई पाडवी,सुनीता पवार यांचा सत्कार ग्रामविस्तार अधिकारी विजय पाटील सेंट्रल बँकेचे मॅनेजर अमोल राठोड, प. स सदस्य विजयसिंह राणा वि.का सो चेअरमन कृष्णदास पाटील यांनी शाल श्रीफळ देवून केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना प. स सदस्य विजयसिंह राणा यांनी केले. यावेळी आ. डॉ. विजयकुमार गावित व डॉ कांतीलाल टाटिया यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन केले कागदपत्राची पूर्तता करून पीक कर्ज घेण्याचे आवाहन केले. खा. डॉ. हिना गावीत यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले की, केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान क्रेडिट कार्ड, जनधन योजना, स्टँड अप इंडिया,जीवन ज्योती विमा योजना,पीक कर्ज योजना,मत्स व्यवसाय साठी कर्ज,मुद्रा योजना, पशू पालन कर्ज योजना,महिलांसाठी उज्वला गॅस योजना इ. योजना बाबत माहिती दिली. प्रत्येक गावातील तलाठी,ग्रामसेवक, मंडळ अधिकारी,कृषी सहायक यांनी आपल्या कडे आलेल्या शेतकर्यांचे कर्जाचे फॉर्म भरून घ्यावेत व वेळेवर कागदपत्रांची पूर्तता करावी त्वरित पीकपाहणी लावावी शेतकर्यांना पीक कर्जाबाबत फिरफार होणार नाही याची काळजी व बँकेच्या अधिकार्यांनी कागद पत्राची पूर्तता झाल्यानंतर तात्काळ कर्ज मंजूर करावे शेतकर्यांना त्वरित किसान कार्ड द्यावे,जनधन योजनेचे त्वरित खाते उघडावे शेतकर्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी पुढे यावे नंदुरबार जिल्ह्यात एकूण १ लाख ६६ हजार शेतकरी आहेत.त्यापैकी फक्त १७ हजार शेतकर्यांनी कर्ज घेतले आहे. किसान कार्ड धारक असलेल्या शेतकर्यांना १ ते १० लाख पर्यंत बीनव्याजी कर्ज देण्याची योजना आहे.तर थकबाकी शेतकर्यांसाठी सरल योजना सुरू केली आहे. त्याचा फायदा शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन खा. डॉ हिना गावीत यांनी केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प. स.सदस्य विजयसिंह राणा यांनी केले. यावेळी बोरद मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागाचे कर्मचारी, वि. वि.का सोसायटी व जि. म बँकेचे सर्व कर्मचारी तसेच व्यासपीठावर बोरद परिसरातील सर्व सरपंच ग्रा. प. सदस्य प्रतिष्ठित शेतकरी, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी, भरत पवार, प्रताप वसावे कालुसिंग पवार गट विकास अधिकारी रोहिदास सोनवणे पंचायत समितीचे ग्रा. प. विभागाचे विस्तार अधिकारी बी.के पाटील, कृष्णदास पाटील, लोटन राजपूत, जितेंद्र पाटील, किशोर पाटील अशोक पाटील, इस्माईल तेली, कलीम तेली, काळू तेली ई.सह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.