Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बैलगाडीचे चाक अंगावरुन गेल्याने दहा वर्षीय बालक ठार

team by team
January 1, 2023
in क्राईम
0
बैलगाडीचे चाक अंगावरुन गेल्याने दहा वर्षीय बालक ठार
नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातील निंभोरा शिवारातील केदारेश्वर खांडसरी येथे बैलाने हिसका दिल्याने ऊसाने भरलेल्या बैलगाडीवरील  बालकाचा तोल गेला व बैलगाडीचे चाक अंगावरून  गेल्याने दहा वर्षीय बालकाच्या मृत्यू झाल्याची घटना  घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील निंभोरा शिवारातील केदारेश्वर खांडसरी येथे नारायण सरदार जाधव रा.वसंतवाडी ता.पारोळा जि.जळगाव, ह.मु.केदारेश्वर खांडसरी हे आपल्या दोन मुलांना घेऊन पत्नीसह ऊस तोडणीचे काम करतात. ३१ डिसेंबर रोजी देखील भल्या पहाटे त्यांनी ऊस तोडणीसाठी मिळालेल्या शेत शिवाराचा पत्ता घेऊन शेत गाठले.
दिवसभर ऊस तोडणी करून बैलगाडीमध्ये ऊस भरला. त्यासाठी दोन्ही मुले विक्रम जाधव (वय १३) व विकी जाधव (वय १०) यांनी आईसह ऊसतोड केली व गाडी भरण्यास मदत केली.
दोन्ही मुलांपैकी लहान मुलगा विकी जाधव बैलगाडीवर असताना अचानक बैलांनी बैलगाडीला हिसका दिल्याने विकी जाधव याचा तोल जाऊन तो खाली जमिनीवर पडला. त्याचवेळी त्याच्या अंगावरून बैलगाडीचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
त्या अवस्थेत शेतमालक पुंडलिक मोरे व कुटूंबियांनी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे विकी जाधव यास दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यास मयत घोषित केले. या घटनेत ऊस तोडणीसाठी आलेल्या कुटुंबाच्या दहा वर्षीय मुलगा गमावला गेल्याने ऊस तोडणीचे विदारक चित्र सर्वांच्या समोर उभे राहिले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे काढण्यात आलेली व्यसनमुक्ती रॅली

Next Post

 पंक्चर काढणाऱ्या तरुणाला ट्रकने धडक दिल्याने झाला मृत्यू 

Next Post
 पंक्चर काढणाऱ्या तरुणाला ट्रकने धडक दिल्याने झाला मृत्यू 

 पंक्चर काढणाऱ्या तरुणाला ट्रकने धडक दिल्याने झाला मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add