म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे नवीन जलकुंभ उभारणीसाठी चे जेसीबीने खोदकाम करत असताना नागबर्डा येथे सुमारे पाच फूट उंचीचे काळ्यापाषाणाची देवाची मूर्ती सापडली.
सविस्तर प्रकाशा ता. शहादा येथील नागबर्डा येथे हर घर जल योजनेअंतर्गत आज कामाचा शुभारंभ झाला. सायंकाळी नागबर्डा येथे जेसीबीने खोदकाम सुरू असताना प्राचीन मुर्ती निघाली. मूर्ती ही पूर्ण मातीमध्ये दाबली गेली होती.मातीत माखल्यामुळे
ती सुरुवातीला पांढरी दिसत होती. मात्र बाहेर काढल्यानंतर पाण्याने धुतल्यानंतर ती काळा पाषाण दिसून आली. मुर्त्या गावात सापडल्याची पहिल्या घटना नसून आतापर्यंत अनेक मुर्त्या प्रकाशां येते सापडलेले आहेत.
नागबर्डा येथे सापडलेली मूर्ती काळा पाषाणाची असून पाच फूट उंचीची आहे.मूर्तीही बैठकीत असून, ध्यानस्थ अवस्थेत दिसून येत आहे.मूर्तीला चार भुजा दाखवण्यात आलेले आहेत, डोक्यावर घुमट, डोळे हे ध्यान अवस्थेत आहेत. कानामध्ये कुंडल आहे. गळ्यामध्ये हार दाखवलेला आहे. तर चारही भुजा मध्ये शस्त्र दाखवण्यात आलेला आहे. सदर मूर्ती ही कोणत्या देवताचे आहे, किती वर्ष जुनी आहे, हे मात्र समजू शकले नाही. मात्र मूर्ती कुठे खंडित झालेली दिसून येत नाही. पूर्ण अवस्थेत आहेत मूर्ती निघाल्यानंतर पाहणाऱ्यांची गर्दी या ठिकाणी जमली होती.
तेथे राहणारे दशरथ पुरुषोत्तम चौधरी यांनी फोन करून ही बातमी कळवली.याच ठिकाणी आता ही मूर्ती स्थापन करावी अशी मागणी ग्रामस्थांची होत आहे. प्रकाशा गावामध्ये आतापर्यंत पुरातन काळातील मुर्त्या, तसेच जुने नाणे, कुवा, विक्टरिया राणी यांच्या काळातील चांदीचे नाणे निघाले आहेत . आणि पुन्हा ही मूर्ती निघाली म्हणजे गावामध्ये जुना इतिहास घडल्याचे दिसून येत आहे.








