नंदूरबार । प्रतिनिधी
तळोदा येथील भोई गल्लीत वास्तव्यास असणारे कृतिशील विद्यार्थी प्रिय शिक्षक चंद्रकांत भोई यांनी आपला वाढदिवस संसारोपयोगी वस्तू वाटप करून साजरा केला. यावेळी मोठ्या संख्येने भोईगल्ली, कुंभारगल्ली, जोहरी गल्लीतील रहिवासी उपस्थित होते.
याआधी देखील चंद्रकांत भोई यांनी आपला वाढदिवस गरजू बालकांना वही, पेन वाटप करून साजरा केला होता. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजपा शहराध्यक्ष योगेश चौधरी, नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी, शिवशेना शहरप्रमुख जितेंद्र दुबे, कल्पेश चौधरी, भोईसमाज जिल्हाध्यक्ष संतोष वानखेडे, तालुकाध्यक्ष धनलाल शिवदे, माजी नगरसेवक चंदूलाल सोनवणे,
माजी अध्यक्ष शिवदास वानखेडे, कुंभार समाज जेष्ठ मणीलाल कुंभार, जोहरी समाज युवा कार्यकर्ता सुधाकर जोहरी, मधुकर रामोळे, जगदीश वानखेडे, चंद्रकांत साठे, पवन मोरे, किशोर कुंभार, चिंटू जोहरी, महारु साठे, अमोल वानखेडे, जयेश कुंभार, गिरीश वानखेडे, शिवम माळी, भैय्या जोहरी, हिरालाल साठे, धीरज साठे, जतीन साठे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वानखेडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंभार गल्ली, जोहरी गल्ली व भोईगल्लीतील मित्रपरिवार यांनी सहकार्य केले.








