नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी. आर. हायस्कूल च्या 17 वर्षे वयोगटातील शालेय टेनीक्वाईट संघाने नाशिक विभागीय स्पर्धेत चुरशीच्या अंतिम सामन्यात नाशिक संघाचा पराभव करून राज्यस्तरावर धडक मारली. तर 14 वर्षे वयोगटातील संघ हा सुद्धा नाशिक विभागीय स्पर्धेत उपविजेता ठरला.
17 वर्षे वयोगटातील यशस्वी विद्यार्थी प्रणील सोनवणे,जन्मेजय पगारे, साईराज बडगुजर, मयूर पाटील कमलेश गायकवाड व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक पंकज पाठक यांचे मुख्याध्यापक नारायण भदाणे, उपमुख्याध्यापक सुभाष चौधरी, पर्यवेक्षक विपुल दिवाण तसेच क्रीडा विभाग प्रमुख जगदीश बच्छाव व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.